________________
(१०३)
गणांचे पुन्हा पुन्हा चिंतन केल्याने मोक्षपदाची प्राप्ती होते. निर्जरा मावना
आत्मा जोपर्यंत कर्मयुक्त आहे तोपर्यंत मोक्षप्राप्तीचे ध्येय पूर्ण होत नाही. सनिहित होण्यासाठी संवर भावनेवर आपण चिंतन केले पाहिजे ज्यामुळे नवीन कर्म आल्यामध्ये प्रवेश करीत नाही. इतक्यानेच काम पूर्ण होत नाही. ज्याप्रमाणे सरोवराचे नाळे बंद केल्याने नवे पाणी येण्याचे बंद होते परंतु अगोदर जे पाणी साठले आहे ते तर असेच राहते, त्याला उपसून बाहेर फेकल्याने तलाव एकदम रिकामा होतो, त्याचप्रमाणे आल्यावर अनादी काळापासून लागलेल्या कर्मांना नष्ट करायचे असेल तर संवराद्वारे येत्या कर्माला थांबवून पूर्वी जो आत्म्याला कर्माचा बंध झाला आहे त्याला दूर केले पाहिजे. त्यासंबंधी तत्त्वार्थसूत्रात सांगितले आहे - "तपसा निर्जरा च ।"५३ निर्जरा तपाद्वारे होते. त्याने कर्मे जीर्ण होतात, झडतात.५४ निर्जरेचे दोन प्रकार आहेत- सकाम निर्जरा, अकाम निर्जरा.५५ ह्यांना सविपाक आणि अविपाक निर्जरा सुद्धा म्हणतात. 'सकाम निर्जरा' म्हणजे आत्मकल्याणाच्या ध्येयाने संकल्पपूर्वक जे तप केले जाते, त्याने जी कर्मे निर्जरीत होतात ती सकाम निर्जरा आहे आणि व्रत प्रत्याख्यान केल्याशिवाय, असेच कष्ट सहन केल्याने जी कर्मे नष्ट होतात त्याला अकामनिर्जरा म्हणतात.
कर्माला प्रतिबंध करण्यासाठी ज्याप्रमाणे संवराची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे कर्म नष्ट करण्यासाठी निर्जरेची आवश्यकता आहे. संवर साधना केली पण जर निर्जरा करण्याची साधना केली नाही तर मोक्षाची लक्ष्यपूर्ती होत नाही. कारण की संचित कर्माच्या बळावर संसार परिभ्रमण चालतच राहील. तो समाप्त होणार नाही. संवर आणि निर्जरा दोन्हींची आराधना केल्याने आत्म्याला लक्ष्यसिद्धी प्राप्त होऊ शकते.
निर्जरा भावनेमध्ये निर्जरेच्या स्वरूपाचे चिंतन केले जाते. अनंतकाळच्या संचित कर्मामुळे जीव ह्या संसारचक्रामध्ये भ्रमण करत राहतो. जोपर्यंत संचित कर्म नष्ट होत नाही तोपर्यंत ह्या संसारचक्रातून सुटका होत नाही. निर्जरा अथवा तपश्चर्येद्वाराच संसार चक्रातून सुटका होईल. संवर भावनेने तर येथे केवळ कर्मास प्रतिबंध होतो म्हणून साधकाने हचितन केले पाहिजे की त्याला कर्माला अडविण्याबरोबर कर्मबंध तोडायचे सुद्धा आहे,
भाण करायचे आहे. पुन्हा पुन्हा तसा अभ्यास केल्याने त्याच्या मनामध्ये तपभावना जागृत होते आणि जेव्हा भावना परिपक्व होते तेव्हा ती आचरणाचे - चर्येचे रूप घेते.
नामध्य कार्यान्वित होते तसे होणे आत्मसाधनेसाठी अत्यंत सहायक आह.