________________
(१०१)
आत्मवान पुरुषाला सर्वप्रथम ह्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे की मन, वचन आणि जगाच्या प्रवृत्तीला 'योग' म्हणतात. "शुभ योग युक्त प्रवृत्ती'' शुभयोगानव आहे आणि
शम योग युक्त प्रवृत्ती" अशुभयोगास्रव आहे. शुभयोगाने पुण्याचा बंध होतो व आभयोगाने पापाचा बंध होतो. मुमुक्षू पुरुषासाठी हे दोन्हीही त्याज्य आहेत. कारण जोपर्यंत कर्मबंध होत राहतील तोपर्यंत मोक्ष प्राप्त होणार नाही. परंतु साधकासाठी पुण्यपाप दोघांचा एकाचवेळी त्याग करणे संभवत नाही म्हणून सर्वप्रथम अशुभयोगाच्या त्यागाचे विशिष्ट ध्यान ठेवले पाहिजे.
साधकाने स्वतःला पापयुक्त प्रवृत्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तो जसा साधनेच्या मार्गावर पुढे जातो तसा शुभयोगासवाचाही निरोध करत जातो. पुढे जाता आत्मसाधनेमध्ये एकाग्र राहणारा साधक अशा स्थितीला प्राप्त होतो की तो शुभ योगापासूनही निवृत्त होतो आणि आत्म्याच्या शुद्धभावाच्या दिशेनेही पुढे जातो. परंतु प्रत्येक साधकाने आपला मूळ हेतू 'आस्रव' त्यागण्याचा ठेवला पाहिजे. मग ते शुभ असो अथवा अशुभ. अशुभास्रव जर लोखंडाची बेडी आहे तर शुभ योगास्रव सोन्याची बेडी आहे. बेडी सोन्याची असो किंवा लोखंडाची परंतु त्यांच्याद्वारे बंदिस्त झाले तर कष्ट होणारच.
आस्रवभावना आत्म्याच्या आस्रवभावाला सोडण्याची प्रेरणा देते. ह्याचे निरंतर चिंतन केल्याने मनुष्याचे मन प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाते व निवृत्तीतच खरा मोक्षाचा मार्ग आहे, खरा धर्म आहे.
जो कर्माचा आस्रव होणाऱ्या क्रिया करीत जातो त्यालाच चतुर्गतिरूप संसारात भ्रमण करावे लागते. आस्रव इहलोक, परलोक या दोन्ही लोकात दुःखरूप आहे. पाच इद्रिये, चार कषाय, पाच अव्रत आणि पंचवीस क्रियारूप आसवांद्वारे कर्मरूपी मळाचा अवश झाल्यावर संसार सागरात पतन होते आणि मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. अशाप्रकारे आनवाच्या दोषाचे पुन्हा पुन्हा चिंतन करणे ही आस्रवानुप्रेक्षा आहे. जो साधक साम्यभावामध्ये लीन राहतो आणि मोह कर्माच्या उदयाने होणाऱ्या
ना त्याज्य समजून त्याचा त्याग करतो त्यांची आस्रव भावना सार्थक होते.
पूषाक्त आस्रवभावांना त्याज्य समजून त्याचा त्या
संवर भावना
सवर शब्द संस्कृत भाषेतील आहे. ह्याचा अर्थ 'आवृत्त करणे, झाकणे अडविणे'