________________
(१००)
पीलो त्याला मलमूत्राच्या रूपाने बाहेर टाकतो. हे मलमूत्र ज्या शरीराच्या संदरतेचा
तेचा मनुष्य अभिमान करतो त्यातच राहतात. मलमुत्राच्या अतिरिक्त नाक पाटि शरीराच्या नऊद्वारांमधून प्रतिक्षण अशुचिमय पदार्थ बहात रहातात. ते श्लेष्म,
त्यादी पदार्थ पण अत्यंत घृणित व घाणेरडे आहेत. मनुष्य फक्त बाह्य भाग पाहातो. त पहात नाही म्हणूनच शरीरावर फार प्रेम करतो. त्याने देहाच्या वास्तविक स्वरूपाला समजले पाहिजे. अशुचिभावनेत ह्याच सत्याचा उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला आहे.
जेव्हा मानव देहाच्या घृणिततेचा अनुभव करतो. मात्र सांगण्यापुरते नाही पण त्याची वास्तविकता समजतो. शरीराबरोबर अनादिकाळापासून असलेले ममत्वाचे बंधन दिल होतात.
अशुचिभावना मनुष्याला आत्मकेन्द्रित बनण्यासाठी फारच हितकारक आहे. कारण अनुष्य अध्यात्माची खूप चर्चा करतो पण त्याची दृष्टी नेहमी देहावर लागलेली असते. तो आल्यावर लागणाऱ्या विकाराने भीत नाही पण शरीरात होणाऱ्या विपरीत परिणामाने घाबरून जातो आणि सावधान होतो.
अशुचिभावनेचे चिंतन पुन्हा पुन्हा केल्याने मनुष्यात आत्मचेतनेचा संचार होतो. र तो जड पासून चैतन्याकडे उन्मुख होतो. तो स्वत:च्या शरीराचा राग करत नाही आणि दुसऱ्यांच्या शरीराने पण विरक्त होतो आणि आत्मभावात लीन राहतो. ज्याची शरीराबरोबर एकत्वबुद्धी असते तो सुखदुःखाने सुटू शकत नाही. आणि जो आत्मभावनेत लीन राहतो त्याला सुखदुःख स्पर्श पण करू शकत नाही.
आनद भावना
ह्या संसाराचा प्रवाह कर्मावर आधारीत आहे. जीव अनादी काळापासून कर्माने जात आहे. आणि कर्माचे बंधन दिवसेंदिवस बांधतच राहतो, संसारात आवागमनाचा क्रम चालूच राहतो. अशाप्रकारे कर्माचा आत्म्यामध्ये जो प्रवाह चालू राहतो त्याला 'आरनव' म्हणतात. जैन परंपरेमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे.
आस्रव बंध हेतु: स्यात् संवरो मोक्षकारणम् । इतियमाईती दृष्टिरण्यत् सर्व प्रपंचनम् ॥
अथ - 'आस्रव' बंधाचे कारण आहे तर संवर मोक्षाचे कारण आहे. हा जैन दशनाचा दृष्टिकोन आहे. बाकी सर्व काही केवळ प्रपंच आहे.
ELAM