________________
(९९)
आसक्तीमुळे प्राणी, देव इत्यादी पदार्थांना आपले मानतो. ज्यांना आपले मानले जाते त्यांच्याबद्दल स्वाभाविकच प्रेम उत्पन्न होते. आणि अशा पदार्थात जर काही अडथळा निर्माण झाला तर मनुष्य दुःखी होतो, कष्टी होतो, क्रोधाविष्ट होतो. त्याचे संतुलन बिघडते. बिघडल्यावर अशी व्यक्ती धर्माराधना करू शकत नाही. धर्माराधना अथवा संतुलन आत्मसाधनेत तर मनाची स्थिरता अत्यंत आवश्यक आहे.
अन्यत्वभावनेमध्ये सांसारीक पदार्थ आणि आत्मा ह्या दोघांची भिन्नता जाणण्याबर अधिक जोर दिला आहे. बाह्य पदार्थ आपले नाहीत. जी वस्तू आपली असते ती आपल्यापासून कधीच 'पृथक' होत नाही किंवा आपल्याला सोडत नाही. कोणत्याच व्यक्तीची ही इच्छा नसते की त्याचे हे शरीर सुटावे परंतु कधी ना कधी सर्वांनाच ह्या शरीराचा त्याग करावा लागतो.
अशाप्रकारे जितके भोग्यपदार्थ आहेत ते सुद्धा नेहमी आपल्याबरोबर राहत नाहीत. धन, संपत्ती, इतकेच काय परंतु ज्यांना आपले मानले जाते ते सगेसोयरे व स्वजनही 'बेळप्रसंगी 'परके' होतात. कोणी कोणाच्या संकटात उपयोगी पडत नाही, म्हणून ममत्व भावना मिथ्या आहे, भ्रांत आहे, असे समजणे आवश्यक आहे.
ह्या भावनेचे पुन्हा पुन्हा चिंतन, मनन केल्याने शरीर इत्यादींची आसक्ती कमी होते. आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर साधकाला शरीर आणि आत्मा दोन्ही भिन्न आहेत असे ज्ञान होते व आत्मध्यानामध्ये साधक लीन होतो. वैराग्याची वृद्धी होते व मोक्षसुखाची प्राप्ती होते.
अशुचि भावना
धर्म आराधना अथवा आध्यात्मिक साधना करताना शरीराचे ममत्व अत्यंत विघ्न आणणारे आहे. म्हणूनच अनित्यादी भावनेचे चिंतन करता करता पण काही उरलेले ममत्व कमी करण्यासाठी अशुचिभावनेचे चिंतन करणे आवश्यक आहे. हे शरीर रस, रक्त, मांस, चरची, मज्जा, अस्यी आणि चमड्याने निष्पन्न झाले आहे. वरच्या चमडीचा पर्दापण सुंदर, शोभिवंत दिसतो. पण जर चमडीच्या आंतरिक भागाला पाहिले तर मनात तत्क्षणी उत्पन्न होते. ते एकदम कुरूप वाटते. घृणा
चांगल्यात चांगले स्वादिष्ट पदार्थ मनुष्य खातो. मधुर पेयपदार्थपान करतो. त्याचे वारीत जाऊन कसे रूपांतरण होते हे सर्व विदित आहे. पदार्थाचा सार संपूर्ण शरीरात व्याप्त होतो आणि उरलेला भाग मलमूत्राच्या रूपात परिवर्तित होतो. रोज
मनुष्य जे काही