________________
प्राकृत व्याकरणे
९७
असुगो। श्रावकः सावगो। आकार: आगारो। तीर्थकरः तित्थगरो। आकर्षः आगरिसो। लोगस्सुजोअगरा इत्यादिषु तु व्यत्ययश्च (४.४४७) इत्येव कस्य गत्वम्। आर्षे अन्यदपि दृश्यते। आकुञ्चनं
आउण्टणं। अत्र चस्य टत्वम्। (अनु.) स्वरापुढील अनादि असणारे आणि असंयुक्त अशा क् ग् च् ज् त् द् प् य्
व् यां (व्यंजनां) चा प्रायः लोप होतो. उदा. क् (चा लोप) :तित्थयरो....सयढं. ग् (चा लोप) :- नओ....मयंको. च् (चा लोप) :- सई...ग्गहो. ज् (चा लोप) :- रययं...गओ. त् (चा लोप) :विआणं...जई. द् (चा लोप) :- गया, मयणो. प् (चा लोप) :- रिऊ, सुउरिओ. य् (चा लोप) :- दयालू...विओओ. व् (चा लोप) :लायण्णं...याणलो. प्रायः (लोप होतो) असा निर्देश असल्यामुळे क्वचित् (क् ग्, इत्यादींचा लोप) होत नाही. उदा. सुकुसुमं...दाणवो. स्वरापुढेच (असणाऱ्या क् ग्, इत्यादींचा लोप होतो. त्यामुळे मागे अनुस्वार असल्यास असा लोप होत नाही. उदा.) संकरो...संवरो. (क् ग् इत्यादि) असंयुक्त असतानाच (त्यांचा लोप होतो; ते संयुक्त असल्यास, त्यांचा लोप होत नाही. उदा.) अक्को...सव्वं. क्वचित् संयुक्त असणाऱ्या (क् इत्यादींचा लोप होतो. उदा.) नक्तंचरः नक्कंचरो. अनादि असणाऱ्याच (क् ग् इत्यादींचा लोप होतो; ते आदि असतील तर त्यांचा लोप होत नाही. उदा.) कालो...वण्णो. यकार आदि असताना त्याचा ज होतो, हे पुढे (सू.१.२४५ मध्ये) सांगितले जाईल. समासात मात्र वाक्यविभक्ति अपेक्षेने (दुसरे पद हे) भिन्न पद आहे, अशी विवक्षा असू शकते. त्यामुळे त्या ठिकाणी जसे (वाङ्मयात) आढळते त्याप्रमाणे दोन्हीही (म्हणजे समासातील दुसऱ्या पदाचे आदि व्यंजन हे कधी आदि तर कधी अनादि मानून वर्णान्तर) होते. उदा. सुहकरो...सुहओ, इत्यादी. क्वचित् (च्, प् इत्यादि) आदि असतानाही (त्यांचा लोप होतो. उदा.) स पुनः...इन्धं. क्वचित् च् चा ज् होतो. उदा. पिशाची पिसाजी.
१ लोकस्य उद्योतकराः।