________________
प्राकृत व्याकरणे
८१
( सूत्र ) दुकूले वा लश्च द्विः ।। ११९।।
(वृत्ति) दुकूलशब्दे ऊकारस्य अत्वं वा भवति तत्संनियोगे च लकारो द्विर्भवति । अल्लं दुऊलं । आर्षे दुगुल्लं ।
(अनु.) दुकूल या शब्दांत, ऊकाराचा अ विकल्पाने होतो, आणि त्याच्या सांनिध्यामुळे लकाराचे द्वित्व होते. उदा. दुअल्लं दुऊलं. आ प्राकृतात:दुगुल्लं (असे दुकूलचे वर्णान्तर होते).
( सूत्र ) ईर्वोद्वयूढे ।। १२०।।
(वृत्ति) उद्वयूढशब्दे ऊत ईत्वं वा भवति । उव्वीढं । उव्वूढं । (अनु.) उद्व्यूढ या शब्दात, ऊ चा ई विकल्पाने होतो. उदा. उव्वीढं, उव्वूढं.
( सूत्र ) उर्भूहनूमत्कण्डूय - वातूले ।। १२१ ।।
(वृत्ति) एषु ऊत उत्वं भवति । भुमया । हणुमन्तो । कण्डुअइ । वाउलो ।
(अनु.) भ्रू, हनूमत्, कण्डूय आणि वातूल या शब्दांत, ऊ चा उ होतो. उदा. भुमया.... ....वाउलो.
( सूत्र ) मधूके वा ।। १२२।।
(वृत्ति) मधूकशब्दे ऊत उद् वा भवति । महुअं महूअं ।
(अनु.) मधूक या शब्दात, ऊ चा उ विकल्पाने होतो. उदा. महुअं, महूअं.
( सूत्र ) इदेतौ नूपुरे वा ।। १२३।।
(वृत्ति) नूपुरशब्दे ऊत इत् एत् इत्येतौ वा भवतः । निउरं नेउरं । पक्षे नूउरं । (अनु.) नूपुर या शब्दात, ऊ चे इ आणि ए असे हे (स्वर) विकल्पाने होतात. उदा. निउरं, नेउरं. (विकल्प - ) पक्षी : - नूउरं.