________________
प्राकृत व्याकरणे
७९
(सूत्र) पुरुषे रोः ।। १११॥ (वृत्ति) पुरुषशब्दे रोरुत इर्भवति। पुरिसो। पउरिसं। (अनु.) पुरुष या शब्दात, रु मधील उ चा इ होतो. उदा. पुरिसो, पउरिसं.
(सूत्र) ई: क्षुते ।। ११२॥ (वृत्ति) क्षुतशब्दे आदेरुत ईत्वं भवति। छीअं। (अनु.) क्षुत या शब्दात, आदि उ चा ई होतो. उदा. छीअं.
(सूत्र) ऊत्सुभग-मुसले वा ।। ११३।। (वृत्ति) अनयोरादेरुत ऊद् वा भवति। सूहवो सुहओ। मूसलं मुसलं। (अनु.) सुभग आणि मुसल या दोन शब्दांत, आदि उ चा ऊ विकल्पाने होतो.
उदा. सूहवो... मुसलं.
(सूत्र) अनुत्साहोत्सन्ने त्सच्छे ।। ११४।। (वृत्ति) उत्साहोत्सन्नवर्जित शब्दे यौ त्सच्छौ तयोः परयोरादेरुत ऊद् भवति।
त्स। ऊसुओ। ऊसवो। ऊसित्तो। ऊसरइ। च्छ। उद्गता: शुका यस्मात् स: ऊसुओ। ऊससइ। अनुत्साहोत्सन्न इति किम्। उच्छाहो।
उच्छन्नो। (अनु.) उत्साह आणि उत्सन्न हे शब्द सोडून, (इतर) शब्दांत असणारे जे त्स
आणि च्छ, ते पुढे असता, (त्या शब्दातील) आदि उ चा ऊ होतो. उदा. त्स (पुढे असताना) :- ऊसुओ...ऊसरइ. च्छ (पुढे असताना):- जेथून पोपट निघून गेले आहेत तो, ऊसुओ; ऊससइ. उत्साह व उत्सन्न हे शब्द सोडून असे का म्हटले आहे ? (कारण या शब्दांत उ चा अ होत नाही. उदा.) उच्छाहो, उच्छन्नो.
१ पौरुष. ३ उच्छुक
२ क्रमाने:- उत्सुक, उत्सव, उत्सिक्त, उत्सरति ४ उच्छृसिति