________________
प्राकृत व्याकरणे
७७
(अनु.) जीर्ण या शब्दात, ई चा उ होतो. उदा. जुण्णसुरा. क्वचित् (जीर्ण मधील ई चा उ) होत नाही. उदा. जिणे.... . मत्ते.
( सूत्र ) ऊर्हीन - विहीने वा ।। १०३ ।।
(वृत्ति) अनयोरीत ऊत्वं वा भवति । हूणो हीणो । विहूणो विहीणो । विहीन इति किम् । पहीण - जर १ - मरणा ।
(अनु.) हीन आणि विहीन या दोन शब्दांत, ई चा ऊ विकल्पाने होतो. उदा. हूणो...विहीणो. विहीन शब्दात (ई चा विकल्पाने ऊ होतो) असे का म्हटले आहे ? ( कारण हीन च्या मागे वि खेरीज इतर उपसर्ग असताना, ई चा ऊ होत नाही. उदा) पहीण....मरणा.
( सूत्र ) तीर्थे हे ।। १०४।।
(वृत्ति) तीर्थशब्दे हे सति ईत ऊत्वं भवति । तूहं । ह इति किम्। तित्थं । (अनु.) तीर्थ या शब्दात, (वर्णविकाराने पुढे) ह् (हे व्यंजन) आले असता, ई चा ऊ होतो. उदा. तूहं. (पुढे) ह् हे व्यंजन (आले असता) असे का म्हटले आहे? (कारण पुढे जर ह् येत नसेल, तर ई चा ऊ होत नाही. उदा.) तित्थं.
( सूत्र ) एत्पीयूषापीड - बिभीतक - कीदृशेदृशे ।। १०५ ।। (वृत्ति) एषु ईत एत्वं भवति । पेऊसं । आमेलो। बहेडओ। केरिसो । एरिसो । (अनु.) पीयूष, आपीड, बिभीतक, कीदृश आणि ईदृश या शब्दांत, ई चा ए होतो. उदा. पेऊसं... एरिसो.
( सूत्र ) नीड - पीठे वा ।। १०६ ।।
( वृत्ति) अनयोरीत एत्वं वा भवति । नेडं नीडं । पेढं पीढं।
(अनु.) नीड आणि पीठ या दोन शब्दांत, ई चा ए विकल्पाने होतो. उदा. नेड......
पीढ़
१ प्रहीणजरामरणाः ।