________________
६८
प्रथमः पादः
(सूत्र) श्यामाके म: ।। ७१।। (वृत्ति) श्यामाके मस्य आत: अद् भवति। सामओ। (अनु.) श्यामाक या शब्दात म् शी संपृक्त असणाऱ्या आ चा अ होतो. उदा.
सामओ.
(सूत्र) इः सदादौ वा ।। ७२।। (वृत्ति) सदादिषु शब्देषु आत इत्वं वा भवति। सई सया। निसिअरो
निसाअरो। कुप्पिसो कुप्पासो। (अनु.) सदा, इत्यादि शब्दांत, आ चा इ विकल्पाने होतो. उदा. सइ... कुप्पासो.
(सूत्र) आचार्ये चोच्च ।। ७३।। (वृत्ति) आचार्यशब्दे चस्य आत इत्वम् अत्वं च भवति। आइरिओ।
आयरिओ। (अनु.) आचार्य या शब्दात, च शी संपृक्त असणाऱ्या आ चा इ आणि अ होतो.
उदा. आइरिओ, आयरिओ.
(सूत्र) ईः स्त्यान-खल्वाटे ।। ७४।। (वृत्ति) स्त्यानखल्वाटयोरादेरात ईर्भवति। ठीणं थीणं थिण्णं। खल्लीडो।
संखायं इति तु समः स्त्य: खा (४.१५) इति खादेशे सिद्धम्। (अनु.) स्त्यान आणि खल्वाट या शब्दांत, आदि आ चा ई होतो. उदा. ठीणं....
खल्लीडो. (मग संस्त्यै या धातूपासून संखायं हे रूप कसे होते ? उत्तर-) ‘समः स्त्य: खा' या सूत्रानुसार (स्त्यै चा) खा होऊन संखायं हे रूप सिद्ध झाले आहे.
१ क्रमाने:- सदा, निशाक(च)र, कूर्पास. २ पुढे संयुक्त व्यंजन आल्याने, मागील दीर्घ ई ह्रस्व झाली आहे.