SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 64
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे ( सूत्र ) प्रथमे प - थोर्वा ।। ५५ ।। (वृत्ति) प्रथमशब्दे पकारथकारयोरकारस्य युगपत् क्रमेण च उकारो वा भवति । पुढुमं पुढमं पढुमं पढमं । (अनु.) प्रथम या शब्दात, पकार आणि थकार यांमधील अकाराचा उकार का वेळी आणि क्रमाने विकल्पाने होतो. उदा. पुढुमं..... पढमं. ( सूत्र ) ज्ञो णत्वेऽभिज्ञादौ ।। ५६ ।। (वृत्ति) अभिज्ञ एवं प्रकारेषु ज्ञस्य णत्वे कृते ज्ञस्यैव अत उत्वं भवति । अहिण्णूः। सव्वण्णू। कयण्णू । आगमण्णू । णत्व इति किम् । अहिज्जो' । सव्वज्जो । अभिज्ञादाविति किम्। प्राज्ञः पण्णो। येषां ज्ञस्य णत्वे उत्वं दृश्यते ते अभिज्ञादयः । (अनु.) अभिज्ञ असल्या प्रकारच्या शब्दांत, ज्ञ चा ण केला असता, ज्ञ मधील अ चाच उ होतो. उदा. अहिण्णु.... आगमण्णू. (ज्ञ चा) ण केला असता असे (सूत्रात) का म्हटले आहे ? ( कारण जर ज्ञ चा ण केलेला नसेल, तर ज्ञ मधील अ चा उ होत नाही. उदा.) अहिज्जो, सव्वज्जो. (सूत्रात) अभिज्ञ, इत्यादि शब्दांत असे का म्हटले आहे ? ( कारण अभिज्ञ, इत्यादि शब्द सोडून, इतर शब्दात ज्ञ चा ण केला असून सुद्धा, ज्ञ मधील अ चा उ होत नाही. उदा.) प्राज्ञः पण्णो. ( मग अभिज्ञ, इत्यादि शब्द तरी कोणते ? उत्तर-) ज्या शब्दांत ज्ञ चा ण होऊन, (ज्ञ मधील अ चा ) उ झालेला दिसतो, ते अभिज्ञ इत्यादि शब्द. ( सूत्र ) एच्छय्यादौ ।। ५७ ।। (वृत्ति) शय्यादिषु आदेरस्य एत्वं भवति । सेज्जा। सुन्देरं। गेन्दुअं। एत्थ । शय्या । सौन्दर्यं । कन्दुकं। अत्र । आर्षे पुरेकम्मं । १ २ ६३ मूळ शब्द क्रमाने असे मूळ शब्द क्रमाने असे -- अभिज्ञ, सर्वज्ञ, कृतज्ञ, आगमज्ञ. :- अभिज्ञ, सर्वज्ञ.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy