________________
प्राकृत व्याकरणे
५७
(अनु.) संस्कृत व्याकरणानुसार उत्पन्न झालेल्या व अकाराच्या पुढे येणाऱ्या
विसर्गाचे स्थानी ओ (डो) असा आदेश होतो. उदा. सर्वत:...मग्गओ. (शब्दांच्या) सिध्दावस्थेच्या अपेक्षेने अशाप्रकारे वर्णान्तर होते:- भवतः ...कुदो.
(सूत्र) निष्प्रती ओत्परी माल्यस्थोर्वा ।। ३८॥ (वृत्ति) निर् प्रति इत्येतौ माल्यशब्दे स्थाधातौच परे यथासंख्यं ओत् परि
इत्येवं रूपौ वा भवतः। अभेदनिर्देशः सर्वादेशार्थः। ओमानं निम्मलं'।
ओमालयं वहइ। परिट्ठा पइट्ठा। परिट्ठिअं पइट्ठि। (अनु.) निर् आणि प्रति यांपुढे माल्य हा शब्द आणि स्था हा धातु असताना,
विकल्पाने त्यांची रूपे अनुक्रमे ओ आणि परि अशी होतात. (सूत्रातील ____ 'निष्प्रती ओत्परी' असा हा) अभेदनिर्देश संपूर्ण शब्दाला आदेश होतो, हे
दाखविण्यासाठी आहे. उदा. ओमालं... पइट्ठिअं.
(सूत्र) आदेः ।। ३९॥ (वृत्ति) आरित्यधिकारः कगचज0 (१.१७७) इत्यादिसूत्रात् प्रागविशेषे
वेदितव्यः। (अनु.) पहिल्या वर्णाचा' (या सूत्राचा) अधिकार ‘कगचज' इत्यादि सूत्राच्या
मागील सूत्रापर्यंत सामान्यपणे लागू आहे, असे जाणावे.
(सूत्र) त्यदाद्यव्ययात् तत्स्वरस्य लुके ।। ४०॥ (वृत्ति) त्यदादेरव्ययाच्च परस्य तयोरेव त्यदाद्यव्यययोरादेः स्वरस्य बहुलं
लुग् भवति। अम्हेत्थ५ अम्हे एत्थ। जइमा जइ६ इमा। जइहं जइ
अहं।
(अनु.) सर्वनामे आणि अव्यये यांच्यापुढे येणाऱ्या त्याच सर्वनाम आणि अव्यय
४ प्रतिष्ठित
१ निर्माल्य ५ वयं अत्र।
२ निर्माल्यं वहति। ६ यदि इमा।
३ प्रतिष्ठा ७ यदि अहम्।