________________
५६
प्रथमः पादः
संस्कृतवदेव सिद्धम्। इमेति तन्त्रेण त्वादेशस्य डिमा इत्यस्य पृथ्वादीम्नश्च सङ्ग्रहः । त्वादेशस्य स्त्रीत्वमेवेच्छन्त्येके।
(अनु.) इमन् (प्रत्यया) ने अन्त पावणारे शब्द आणि अञ्जलि, इत्यादि शब्द विकल्पाने स्त्रीलिंगात योजावेत. उदा. एसा गरिमा... धुत्तिमा (आता) अञ्जलि, इत्यादि शब्द:- एसा अंजली, एस अंजली. पिट्ठी, पिट्ठ; (या) पृष्ठ शब्दात (ऋ या स्वराचा) इ ( असा स्वर) केला असता, तो शब्द फक्त स्त्रीलिंगात (वापरला जातो), असे काहीजण म्हणतात. ( इतर शब्दः - ) अच्छी...चोरिअं. याचप्रमाणे कुच्छी...गंठी, असे हे अंजलि, इत्यादि शब्द आहेत. गड्डा व गड्डो हे शब्द मात्र संस्कृतप्रमाणेच सिद्ध झालेले आहेत. (सूत्रात) इम (न्) असे नियमन असल्यामुळे, (भाववाचक नामे साधणाऱ्या) त्व (प्रत्यया) चा आदेश म्हणून येणारा इमा (डिमा) हा प्रत्यय तसेच पृथु इत्यादि शब्दांना लागणारा इमन् प्रत्यय, यांचे ग्रहण होते. त्व चा आदेश म्हणून येणारा इमा हा प्रत्यय लागून बनलेले शब्द नेहमी स्त्रीलिंगी असतात, असे काहींचे मत आहे.
( सूत्र ) बाहोरात् ।। ३६ ।।
(वृत्ति) बाहुशब्दस्य स्त्रियामाकारान्तादेशो भवति । बाहाए' जेण धरिओ एक्काए। स्त्रियामित्येव। वामेअरो' बाहू ।
(अनु.) बाहु हा शब्द स्त्रीलिंगात ( वापरला) असताना, त्याच्या अन्ती आकार आदेश होतो. उदा. बाहाए... एक्काए. (बाहु शब्द) स्त्रीलिंगी वापरल्यासच, (त्याच्या अन्ती आकार येतो; तो पुल्लिंगात वापरल्यास, उकारान्तच राहतो. उदा.) वामेअरो बाहू.
( सूत्र ) अतो डो विसर्गस्य ।। ३७।।
( वृत्ति) संस्कृतलक्षणोत्पन्नस्यातः परस्य विसर्गस्य स्थाने डो इत्यादेशो भवति । सर्वतः सव्वओ। पुरतः पुरओ। अग्रतः अग्गओ । मार्गतः मग्गओ । एवं सिद्धावस्थापेक्षया । भवतः भवओ । भवन्तः भवंतो। सन्त: संतो। कुत: कुदो।
१ बाहुना येन धृत एकेन ।
२ वामेतर: बाहुः ।