SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 570
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद ५६९ जाते; जणु वल्लभापासूनच्या विरहरूपी महासरोवराचा ती ठाव (थांग) शोधते आहे. श्लोक ३ :- दीर्घ नयन असणारे व लावण्ययुक्त असे जिनवराचे मुख पाहून, फार मत्सराने भरलेले लवण जणु अग्नीत प्रवेश करते. पवीसइ -- पविस मधील 'इ' सू.४.३२९ नुसार दीर्घ ई झाली. जिणवर -- श्रेष्ठ जिन. सू.४.२८८ वरील टीप पहा. श्लोक ४ :- सखी! चाफ्याच्या फुलामध्ये भ्रमर शिरला आहे; सोन्यात जडविलेला जणु इंद्रनीलच असा तो शोभत आहे. भसलु -- सू.१.२४४ पइट्ठउ, बइठ्ठउ -- पइट्ठ आणि बइट्ठ यापुढे सू.४.४२९ नुसार स्वार्थे अ प्रत्यय आला आहे. ४४५ श्लोक १ :- डोंगरावर ढग लागले; पथिक रडत जात आहे; पर्वताला ग्रासू पहाणारा हा ढग सुंदरीच्या प्राणांवर दया करील ? रडन्तउ -- रडन्त (सू.३.१८१) ला स्वार्थे अ प्रत्यय (सू.४.४२९) लागला आहे. श्लोक २ :- पायाला आतडे चिकटले आहे; शिर खांद्यापासून गळून पडले आहे; तथापि (ज्याचा) हात (अद्यापि आपल्या) कट्यारीवर आहे (अशा त्या) प्रियकराची पूजा केली जाते. ___ खंधस्सु -- ही षष्ठी पंचमी ऐवजी वापरली आहे. अन्नडी -- अन्त्र पुढे स्वार्थे अड (सू.४.४२९) व मग ई (सू.४.४३१) प्रत्यय येऊन, हा शब्द स्त्रीलिंगी झाला आहे. हत्थडउ -- सू.४.४३०. श्लोक ३ :- (पक्षी) शेंड्यावर चढून फळे खातात व शाखा मोडतात; तरी महावृक्ष पक्ष्यांना इजा करीत नाहीत (किंवा) स्वत:चा अपमान झाला असे मानीत नाहीत. डाल -- (दे) शाखा, फांदी. (हिं) डाल.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy