SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 569
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५६८ टीपा -- जैन धर्मात २४ तीर्थंकर मानले जातात. त्यांत शांतिनाथ हा एक तीर्थंकर आहे. ४४२ श्लोक १ :- काशीला जाऊन (नंतर) उज्जयिनीला जाऊन, जे नर मरण पावतात, ते परम पदी जातात; इतर तीर्थांचे नाव (सुद्धा) काढू नको. येथे गम्पिणु व गम्पि यांमध्ये एप्पिणु व एप्पि यांतील आदि एकाराचा लोप झाला आहे. परावहि -- सू.४.३८२. श्लोक २ :- जो गंगेला जाऊन आणि काशीला जाऊन मरण पावतो, तो यमलोकाला जिंकून, देवलोकात जाऊन, क्रीडा करतो. येथे गमेप्पिणु व गमेप्पि यांमध्ये एप्पिणु आणि एप्पिमधील आदि एकाराचा लोप झालेला नाही. सिवतित्थ -- काशी. कीलदि -- कील (सू.१.२०२) पुढे दि प्रत्यय (सू.४.२६०) आला आहे. जिणेप्पि -- सू.४.४४०. जिण :- सू.४.२४१ पहा. ४४३ तृनः प्रत्ययस्य -- धातूपासून कर्तृवाचक नामे सिद्ध करण्याचा तृन् हा प्रत्यय आहे. श्लोक १ :- मारणारा हत्ती, सांगणारे लोक, वाजणारा पटह, भुंकणारा कुत्रा. येथे मारणउ, बोल्लणउ, वज्जणउ, भसणउ यांमध्ये अणअ असा 'तृन्' चा आदेश आहे. पडह -- वाद्यविशेष; नौबत, नगारा. ४४४ नं मल्ल....करहिं -- येथे नं हा इवार्थी आदेश आहे. श्लोक १ :- सूर्यास्ताचे वेळी व्याकुळ चक्रवाक पक्ष्याने कमळाच्या देठाचा (मृणालिका) तुकडा घशात घातला, (पण) तोडला (खाल्ला) (मात्र) नाही; जणु जीवाला जाऊ न देण्यासाठी अडसर घातला. श्लोक २ :- बांगड्या गळून पडतील या भीतीने सुंदरी हात वर करून
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy