________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
पाण्यात न शिरता, ज्या हातातून प्याले गेले आहे, त्या हातांचे चुंबन घेऊन, ती जलवाहक (बाला) (आपल्या) जीवाचे रक्षण करते.
येथे चुंबिवि मध्ये ‘क्त्वा'ला इवि आदेश आहे.
श्लोक ३ :- हात सोडून तू जा; असे असू दे; त्यात काय दोष आहे ? (पण) जर तू माझ्या हृदयातून बाहेर पडशील, तर मुंज रागावला आहे, असे मी समजेन.
येथे विछोडवि मध्ये ‘क्त्वा'ला अवि आदेश आहे. नीसरहि -- सू.४.३८३.
४४० श्लोक १ :- संपूर्ण कषायरूपी सैन्य जिंकून, जगाला अभय देऊन, महाव्रत घेऊन, तत्त्वाचे ध्यान करुन, (ऋषि) आनंद (शिव) मिळवितात.
येथे जेप्पि, देप्पिणु, लेवि, झाएविणु मध्ये क्रमाने एप्पि, एप्पिणु, एवि, एविणु असे ‘क्त्वा'चे आदेश आहेत. कसाय -- क्रोध, मान, माया व लोभ यांना जैनधर्मात कषाय म्हणतात.
४४१ तुम: प्रत्ययस्य -- तुम् हा हेत्वर्थक धा.अ. साधण्याचा प्रत्यय आहे.
श्लोक १ :- स्वत:चे धन देणे दुष्कर आहे; तप करावे असे (कुणालाही) वाटत नाही; मनाला सुख भोगावे असे वाटते, पण भोगता (मात्र) येत नाही.
येथे देवं, करण, भुंजणहं, भुंजणहिं यांमध्ये क्रमाने एवं, अण, अणहं, अणहिं असे 'तुम्' चे आदेश आहेत.
श्लोक २ :- संपूर्ण पृथ्वी जिंकणे व (जिंकून) तिचा त्याग करणे, व्रत (तप) घेणे व (घेऊन) त्याचे पालन करणे, हे जगात शांति (नाथ) तीर्थंकर-श्रेष्ठाविना इतर कुणाला शक्य आहे ?
येथे जेप्पि मध्ये एप्पि, चएप्पिणु मध्ये एप्पिणु, लेविणु मध्ये एविणु आणि पालेवि मध्ये एवि असे 'तुम्' चे आदेश आहेत. सन्ते तित्थेसरेण