________________
५७०
टीपा
४४६ श्लोक १ :- गमतीने (पणएण), डोक्यावर क्षणभर शेखर (गजरा) म्हणून
ठेवलेले, क्षणभर रतीच्या कंठावर लोंबते ठेवलेले, क्षणभर (स्वत:च्या) गळ्यात घातलेले, अशा त्या कामाच्या पुष्पधनुष्याला नमस्कार करा. __ येथे शौरसेनी भाषेतल्याप्रमाणे किद, रदि, विणिम्मविदु, विहिदु यांमध्ये 'त' चा 'द' झालेला आहे.
४४७ प्राकृत इत्यादी भाषांच्या लक्षणांचा होणारा व्यत्यय येथे सांगितला आहे.
४४८ अष्टमे -- आठव्या अध्यायात. प्रस्तुत प्राकृत व्याकरण म्हणजे हेमचंद्राच्या
व्याकरणाचा आठवा अध्याय आहे. सप्ताध्यायीनिबद्ध-संस्कृतवत् - - हेमचंद्र- व्याकरणाच्या पहिल्या सात अध्यायांत संस्कृत व्याकरणाचे विवेचन आहे. श्लोक १ :- खाली असलेल्या सूर्याच्या तापाचे निवारण करण्यास जणु छत्री खाली धरीत आहे अशी, वराहाच्या श्वासाने दूर फेकली गेलेली शेषसहित पृथ्वी विजयी आहे. (विष्णूने वराह अवतार धारण करून पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढले ही पौराणिक कथा येथे अभिप्रेत आहे). अत्र चतुर्थ्या....सिद्धः -- या प्राकृत व्याकरणात चतुर्थीचा आदेश सांगितलेला नाही; तो संस्कृतप्रमाणेच सिद्ध होतो. उदा. हेट्ठिय इत्यादी श्लोकात निवारणाय. सिद्धग्रहणं मङ्गलार्थम् -- हे प्राकृत व्याकरण सूत्रनिबद्ध आहे. सूत्राची व्याख्या अशी :- अल्पाक्षरमसन्दिग्धं सारवद् विश्वतो मुखम्। अस्तोभनवयं च सूत्रं सूत्रविदो विदुः।। त्यामुळे सूत्रात अनावश्यक शब्द असत नाहीत. पण प्रस्तुत सूत्रात सिद्धम् हा शब्द वरवर पाहिल्यास जरी अनावश्यक वाटला, तरी ग्रंथान्ती मंगल यावे, यासाठी तो या सूत्रात वापरलेला आहे.
***