________________
५६४
टीपा
येथे °करालिअउ, दिट्ठउ, किअउ, अग्गिट्ठउ यांमध्ये स्वार्थे अ आहे. मह....दोसडा -- येथे दोसडा मध्ये स्वार्थे अड आहे. एक्क....रुद्धी -- येथे कुडुल्ली मध्ये उल्ल हा स्वार्थे प्रत्यय आहे.
४३० फोडेन्ति....अप्पणउं -- येथे हिअडउं मध्ये स्वार्थे अडअ आहे.
चूडल्लउ....सइ -- येथे चूडल्लउ मध्ये स्वार्थे उल्लअ आहे.
श्लोक १ :- (प्रियकरावरील) स्वामीचा प्रसाद, सलज्ज प्रियकर व सीमासंधीवर वास आणि (प्रियकराचे) बाहुबल पाहून (सुखी झालेली) सुंदरी निश्वास टाकते.
येथे बलुल्लडा मध्ये उल्लअड हा स्वार्थे प्रत्यय आहे. पेक्खिवि -- सू.४.४३९. बाहबलुल्लडउ -- येथे उल्ल, अड आणि अ असे स्वार्थ प्रत्यय आहेत.
४३१ श्लोक १ :- (एक पांथस्थ दुसऱ्या पथिकाला आपल्या प्रियेबद्दल
विचारतो :-) 'पथिका! (माझी) प्रिया दिसली?' (दूसरा उत्तर देतो) 'तुझी वाट पहाणारी व अश्रु आणि श्वास यांनी चोळी ओली व सुकी करणारी (अशी ती मला) दिसली.'
येथे गोरडी मध्ये ई (डी) प्रत्यय आहे. निअन्त -- सू.३.१८१. निअ हा दृश् धातूचा आदेश आहे (सू.४.१८१). करन्त -- सू.३.१८१. एक्क....रुद्धी -- येथे कुडुल्ली मध्ये ई प्रत्यय आहे.
४३२ श्लोक १ :- प्रियकर आला (ही) वार्ता ऐकली; (त्याचा शब्द-) ध्वनि
कानात शिरला; नष्ट होणाऱ्या त्या विरहाची धूळ सुद्धा दिसली नाही.
येथे धूलडिआ मध्ये आ प्रत्यय आहे. वत्तडी -- वत्ताला सू.४.४२९ नुसार स्वार्थे अड प्रत्यय, मग सू.४.४३१ नुसार ई हा स्त्रीलिंगी प्रत्यय लागला. कन्नडइ -- ‘कन्न'ला स्वार्थे अड प्रत्यय (सू.४.४२९) लागला