________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५६३
४२५ श्लोक १ :- अरे प्रियकरा! कोणत्या देशात असला परिहास (केला
जातो) ते सांग. मी तुझ्यासाठी क्षीण होते, पण तू मात्र दुसरीसाठी (क्षीण होतोस).
येथे केहि व रेसि हे तादसँ निपात आहेत. परिहासडी -- सू.४.४२९,४३१. एवं...हा? -- तेहिं व रेसिं ची उदाहरणे :- कहि कसु रेसिं तुहुँ अवर कम्मारंभ करेसि कसु तेहिं परिगह (कुमारपालचरित, ८.७०-७१). वड्ड....तणेण -- येथे तणेण हा तादसँ निपात आहे.
४२६ श्लोक १:- जे थोडे विसरले असूनही आठवले जाते ते प्रिय म्हणावयाचे; पण ज्याचे स्मरण होते व नष्ट होते, त्या स्नेहाचे नाव काय ?
येथे पुणु मध्ये स्वार्थे डु आहे. मणाउँ -- सू.४.४१८. कइँ -- काई (सू.४.३६७) मधील आ चा ह्रस्व (सू.४.३२९) झाला आहे. विणु....वलाहुं -- येथे विणु मध्ये स्वार्थे डु आहे.
४२७ श्लोक १ :- ज्याच्या आधीन इतर (इंद्रिये आहेत) अशा मुख्य
जिव्हेंद्रियाला वश करा. तुंबिनी (दुध्या भोपळ्या) चे मूळ नष्ट झाल्यावर, (त्याची) पाने अवश्य सुकून जातात. __ येथे अवसें मध्ये स्वार्थे डे (एं) आहे. सुक्कहिं -- सू.४.३८२. अवस....अहिं -- येथे अवस मध्ये स्वार्थे ड (अ) आहे.
४२८ श्लोक १ :- एकदाच शील कलंकित झालेल्यांना प्रायश्चित्ते दिली
जातात; पण जो रोज (शील) खडित करतो, त्याला प्रायश्चित्ताचा काय उपयोग ?
येथे एक्कसि मध्ये स्वार्थे डि आहे. देजहिं -- दे धातूच्या कर्मणि अंगाचे वर्तमानकाळ तृ.पु.अ.व.
४२९ श्लोक १ :- जेव्हा विरहाग्नीच्या ज्वालांनी होरपळलेला पथिक रस्त्यावर
दिसला तेव्हा सर्व पथिकांनी मिळून त्याला अग्नीवर ठेवला (कारण तो मेलेला होता).