SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 563
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५६२ ४२३ श्लोक १ :- मला वाटले - हुहुरु शब्द करीत मी प्रेमरूपी सरोवरात बुडून जाईन. पण अचानक कल्पना नसताना, विरहरूपी नौका (मला) मिळाली. हुरु शब्द ध्वन्यनुकारी आहे. नवदि सू.२.१८८. येथे श्लोक २ :- जेव्हा डोळ्यांनी प्रियकर पाहिला जातो तेव्हा कस्कस् शब्द करीत खाल्ला ही जात नाही अथवा घुट्घुट् (शब्द करीत ) प्यालाही जात नाही. (तरी) सुखस्थिति असते. —— —— येथे कसरक्क व घुंट हे शब्द ध्वन्यनुकारी आहेत. खज्जइ 'खा' धातूचे कर्मणि रूप. नउ येथे 'न' शब्दाला स्वार्थे प्रत्यय लागला आहे. घुंट (म) घोट; घुट्घुट्. श्लोक ३ :- माझा नाथ जैन प्रतिमांना वंदन करीत अद्यापि घरातच आहे (= प्रवासाला गेलेला नाही); तोवरच गवाक्षामध्ये विरह (हा) माकडचेष्टा करीत आहे (करू लागला आहे). येथे घुग्घ हा चेष्टानुकरणी शब्द आहे. ताउँ —— —— —— टीपा —— सू.४.४०६. श्लोक ४ :- जरी तिच्या मस्तकावर जीर्ण कांबळे होते व गळ्यात (पुरे) वीस मणिही नव्हते, तरी सुंदरीने सभागृहातील सभासदांना ऊठ-बैस करावयास लाविले. येथे उट्ठबईस हा चेष्टानुकरणी शब्द आहे. लोअडी लोमपुटी. मणियडा मणि शब्दाला सू.४.४२९ नुसार अड हा स्वार्थे प्रत्यय लागला. उट्ठबईस (म) ऊठबैस, उठाबशा. —— —— ४२४ श्लोक १ :- आई, संध्याकाळी (मी) प्रियकराशी कलह केला याचा (मला) पश्चाताप होत आहे. (खरोखर ) विनाशकाळी विपरीत बुद्धी होते. येथे घइं हा निरर्थक वापरलेला निपात आहे. अम्मडि, बुद्ध येथे सू.४.४२९ नुसार प्रथम स्वार्थे अड प्रत्यय आला व मग सू.४.४३१ नुसार ई हा स्त्रीलिंगी प्रत्यय आला. पच्छायावडा सू.४.४२९. ——
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy