________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५६१
मग सू.४.४३१ नुसार स्त्रीलिंगी ई प्रत्यय लागला.
श्लोक १३ :- जो मनात व्याकुळ होऊन चिंता करतो पण एक पैसा किंवा रुपया देत नाही, तो एक मूर्ख; रतिवश होऊन हिंडणारा व घरातच बोटांनी जो भाला फिरवितो, तो एक मूर्ख. °भमिरु -- सू.२.१४५.
श्लोक १४ :- हे बाले! तुझ्या चंचल व अस्थिर कटाक्षांनी (नयनांनी) जे पाहिले गेले, त्यांच्यावर अपूर्ण काळीच मदनाचा हल्ला होतो.
°दडवडउ -- दडवड पुढे सू.४.४२९ नुसार स्वार्थे प्रत्यय आला.
श्लोक १५ :- हरणांनो! ज्याच्या हुंकाराने (तुमच्या) मुखांतून गवत गळून पडते, तो सिंह (आता) गेला; (तेव्हा तुम्ही) निश्चिंतपणे पाणी प्या.
पिअहु -- सू.४.३८४. केरएँ -- केर पुढे सू. ४.४२९ नुसार स्वार्थे अ आला; मग सू.४.३४२ नुसार केरएँ हे तृ.ए.व. हुंकारडएं -- हुंकारड चे तृ.ए.व. (सू.४.३४२). हुंकारड मध्ये हुंकार पुढे सू.४.४२९ नुसार स्वार्थे प्रत्यय आला आहे. तृणाई -- तणाई असा पाठभेद आहे.
श्लोक १६ :- स्वस्थावस्थेत असणाऱ्याशी सर्वच लोक बोलतात. (पण) 'भिऊ नको' असे (फक्त) सज्जनच पीडितां (दुःखितां) ना म्हणतात.
साहु -- सू.४.३६६. आदन्न -- (दे) आर्त. मब्भीसडी -- मब्भीसाला सू.४.४२९ नुसार स्वार्थे अड प्रत्यय लागून, पुढे सू.४.४३१ नुसार स्त्रीलिंगी ई प्रत्यय आला.
श्लोक १७ :- हे मुग्ध (खुळ्या) हृदया! जे जे पाहिलेस त्या त्या ठिकाणी (जर) आसक्त झालास, (तर) फुटणाऱ्या लोखंडाला जसे घणाचे घाव (सोसावे लागतात) तसा ताप तुला सोसावा लागेल. फुट्टणएण -- सू.४.४४३. घण -- (म) घण.