SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 561
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५६० टीपा श्लोक ८ :- इतर चांगल्या वृक्षांवर हत्ती आपली सोंड कौतुकाने (=खेळ म्हणून) घासतो; पण खरी गोष्ट विचाराल, तर त्याचे मन मात्र फक्त सल्लकी (वृक्षा) वरच आहे. कुड्डेण -- सू.१.८४ नुसार कोड मधील ओ ह्रस्व होऊन, त्याचे स्थानी उ आला. श्लोक ९ :- स्वामी! आम्ही क्रीडा केली; तुम्ही असे का बोलता ? अनुरक्त अशा आम्हा भक्तांचा त्याग करू नका. खेड्डयं -- खेड्ड ला स्वार्थे य (क) प्रत्यय लागला आहे. श्लोक १० :- मूर्खा! नद्यांनी वा तळ्यांनी अथवा सरोवरांनी किंवा उद्यानांनी वा वनांनी देश रम्य होत नाहीत, तर सुजनांच्या रहाण्याने (देश रम्य) होतात. ___ सरिहिँ, सरेहिँ, सरवरहिँ, ०वणेहिं, निवसन्तेहिँ, सुअणेहिं -- सू.४.३४७. श्लोक ११ :- हे अद्भुतशक्तियुक्त शठ हृदया! तू शेकडो वेळा माझ्यापुढे म्हणाला होतास की जर प्रियकर प्रवासाला जाईल तर मी फुटेन. हिअडा -- सू.४.४२९. भंडय -- (दे) विट, भडवा; स्तुतिपाठक; शठ. फुटिसु -- सू.४.३८८, ३८५. श्लोक १२:- (या श्लोकात मानवी शरीराचे रूपकात्मक वर्णन आहे. येथे पंच म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये:-) एक (शरीररूपी) कुटी (झोपडी) आहे; तिच्यावर पाचांचा अधिकार आहे (रूद्ध); पाचांची बुद्धि पृथक् पृथक् आहे. हे बहिणी! जेथे कुटुंब आपापल्या छंदाप्रमाणे वागते, ते घर आनंदी कसे राहील ते सांग? कुडुल्ली -- कुडी ला सू.४.४२९ नुसार स्वार्थे उल्ल प्रत्यय लागून,
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy