________________
५५८
टीपा
श्लोक २ :- अंगणात हरीला नाचविला; लोकांना आश्चर्यात पाडले; आता राधेच्या स्तनांचे जे व्हायचे असेल ते होऊ दे. श्लोक ३ :- सर्वांगसुंदर गौरी (सुंदरी) ताज्या (नवीन) विषग्रंथी (बचनागा) प्रमाणे आहे; पण ज्याच्या गळ्याला ती चिकटत नाही, तो (तरुण) वीर (मात्र) मरतो.
नवखी -- (म) नवखा, नवखी. सू.४.४२२ पहा.
४२१ श्लोक १ :- मी म्हटले - हे ढवळ्या बैला! तू धुरा धर; वाईट बैलांनी
आम्हाला पीडा दिली आहे; तुझ्याशिवाय भार वाहिला जाणार नाही; (पण) तू आता विषण्ण का ?
कसर -- (दे) वाईट बैल.
४२२ श्लोक १ :- एक तू कधीही येत नाहीस; दुसरे, (आलास तर) लवकर जातोस. मित्रा! मला कळले आहे की तुझ्यासारखा दुष्ट कोणीही नाही.
येथे शीघ्र शब्दाला वहिल्ल आदेश आहे. कइअह -- ‘कदापि'चा हा आदेश हेमचंद्राने दिलेला नाही. आवही -- आवहि (सू.४.३८३) मध्ये सू.४.३२९ नुसार स्वरबदल झाला. वहिल्लउ -- वहिल्ल पुढे सू.४.४२९ नुसार स्वार्थे अ आला आहे. जाहि -- सू.४.३८३. मित्तडा -- सू.४.४२९. जेहउ -- जेह (सू.४.४०२) पुढे सू.४.४२९ नुसार स्वार्थे अ आला.
श्लोक २ :- जसे सुपुरुष आहेत, तसे कलह आहेत ; जशा नद्या आहेत, तशी वळणे आहेत; जसे डोंगर आहेत, तशा दऱ्या आहेत. हे हृदया! तू का खिन्न होतोस ? डोंगर -- (म) डोंगर. विसूरहि -- सू.४.३८३ . विसूर हा 'खिद् धातूचा आदेश आहे (सू.४.१३२).