________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५५७
४१९ श्लोक १ :- खरोखर कृपण मनुष्य खातही नाही, पीतही नाही, (मनाने)
विरघळतही नाही व धर्मासाठी एक रुपयाही खर्च करीत नाही; यमाचा दूत एका क्षणात प्रभावी होईल, हे तो जाणतही नाही. वेच्चइ -- (म) वेचणे. रूअडउ, दूअडउ -- सू.४.४२९-४३०. पहुच्चइ -- सू.४.३९०. अहवइ....खोडि -- (अथवा चांगल्या वंशात जन्मलेल्यांचा हा दोष (खोडि) नव्हे).
खोडि -- (म) खोड, खोडी.
श्लोक २ :- ज्या देशात प्रियकराचा पत्ता (प्रमाण) लागेल, तेथे जावे. जर तो आला तर त्याला आणीन; (नाहीतर) तेथेच (मी) मरेन.
येथे अथवा चे अहवा असे वर्णान्तर झाले आहे. देसडइ -- सू.४.४२९ नुसार देस पुढे स्वार्थे प्रत्यय आला. जाइज्जइ, लब्भइ आणि अइ -- ही कर्मणि रूपे आहेत.
श्लोक ३ :- प्रवासाला गेलेल्या प्रियकराबरोबर मी गेले नाही आणि त्याच्या वियोगाने मेलेही नाही; या कारणाने त्या प्रियकरास संदेश देण्यास मला लाज वाटते. -- येथे संदेसडा -- सू.४.४२९.
श्लोक ४ :- इकडे मेघ पाणी पितात; इकडे वडवानल क्षुब्ध झाला आहे. (तथापि) सागराचे गांभीर्य पहा; (पाण्याचा) एक कणही कमी झालेला नाही.
एत्तहे -- सू.४.४२०. गहीरिम -- सू.२.१५४.
४२० श्लोक १ :- जाऊ दे (त्याला); जाणाऱ्या (त्या) ला (मागे) बोलवू
नका; किती पावले (तो पुढे) जातो, ते पहाते (मी). त्याच्या हृदयात मी तिरकी बसलेली आहे; (परंतु माझा) प्रियकर जाण्याचे केवळ अवडंबर करतोय.
जाउ -- सू.३.१७३. पल्लवह -- सू.३.१७६.