________________
५५६
टीपा
मला अशीही झोप येत नाही नि तशीही झोप येत नाही.
येथे एवम् ला एम्व आदेश आहे. कउ -- सू.४.४१६. निद्दडी - - सू.४.४२९, ४३१. केम्व, तेम्व -- कथं व तथा यांचे हे आदेश हेमचंद्राने सांगितलेले नाहीत.
श्लोक २ :- (माझ्या) प्रियकराची सिंहाशी जी तुलना केली जाते, त्यामुळे माझा मान खंडित होतो (=मला लाज वाटते); कारण सिंह रक्षक-रहित हत्तींना ठार करतो; (पण माझा) प्रियकर रक्षकांसह (त्यांना) ठार करतो.
श्लोक ३ :- जीवित चंचल आहे; मरण निश्चित आहे; प्रियकरा! कशाला रागवावे ? ज्या दिवशी राग आहे, ते दिवस शेकडो दिव्य वर्षाप्रमाणे होतात. -- होसहि -- सू.४.३८८, ३८२.
श्लोक ४ :- (आपला) मान नष्ट झाल्यावर, जरी देह नाही तरी देश सोडून द्यावा. (पण) दुष्टांच्या करपल्लवांनी दर्शविला जात (तेथे) हिंडू नको. __ येथे ‘मा' तसाच राहिलेला आहे. देसडा -- सू.४.४२९-४३०. भमिज्ज -- सू.३.१७७, १५९. सू.१.८४ नुसार मे मधील ए ह्रस्व झाला, त्याचे ऐवजी इ येऊन भमिज.
श्लोक ५ :- मीठ पाण्यात विरघळते; अरे दुष्ट मेघा! गर्जू नको. कारण ती जळलेली झोपडी गळते; (आतली) सुंदरी आज भिजेल.
येथे 'मा' चा 'म' झाला आहे. अरि -- सू.२.२१७. गज्जु -- सू.४.३८७. अज्जु -- अद्य सारखी अव्ययेही अपभ्रंशात उकारान्त आहेत.
श्लोक ६ :- वैभव नष्ट झाले असता वक्र, वैभवात (मात्र) नेहमीप्रमाणे (जनसामान्य) असणारा चंद्र - इतर दुसरा कोणीही नाही - माझ्या प्रियकराचे किंचित् अनुकरण करतो.