SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 556
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद ५५५ तरी पहाण्यास) वळतात, तेव्हा ते तिरका घाव देतात. येथे प्रायस् शब्दाला प्राइम्व आदेश झाला आहे. घत्त -- घातमधील 'त्' चे द्वित्व होऊन (सू.२.९८-९९) हे वर्णान्तर झाले. श्लोक ४ :- प्रियकर येईल; मी रागावेन; रागावलेल्या माझा तो अनुनय करील. प्राय: दुष्ट (दुष्कर) प्रियकर असे मनोरथ करायला लावतो. येथे प्रायस् शब्दाला पग्गिम्व असा आदेश आहे. रूसेसैं -- सू.४.३८८, ३८५, ४१० ; सू.३.१५७ नुसार धातूच्या अन्त्य अ चा ए झाला आहे. मणोरहई -- मणोरह हा शब्द येथे नपुंसकलिंगामध्ये वापरला आहे. ४१५ श्लोक १ :- विरहाग्नीच्या ज्वाळांनी पेटलेल्या कोणातरी पथिकाने (येथे) बुडी मारली असली पाहिजे. नाहीतर (या) शिशिर काळात थंड पाण्यातून वाफ (धूर) कशी आली असती ? येथे अन्यथा शब्दाला अनु आदेश आहे. बुड्डिवि -- सू.४.४३९. बुड्ड हा मस्ज् धातूचा आदेश आहे (सू.४.१०१). ठिअउ, उअिउ - - ठिअ आणि उअि पुढे सू.४.४२९ नुसार स्वार्थे अ आला आहे. कहतिहु -- सू.४.४१६. ४१६ श्लोक १ :- माझा कांत घरी असता झोपड्या कुठून (कशा) पेटतील ? शत्रूच्या रक्ताने वा स्वत:च्या रक्ताने तो त्या विझवील, यात शंका नाही. येथे कुतस् शब्दाला कउ आदेश आहे. झुपडा -- (म) झाप, झोपडी. धूमु....उअिउ -- येथे कुतस् शब्दाला कहन्तिहु असा आदेश आहे. ४१७ श्लोक १ :- सू. ४.३७९.२ पहा. ४१८ श्लोक १ :- प्रियसंगमाचे वेळी झोप कोठून (येणार) ? प्रियकर जवळ नसता कुठली झोप ? माझ्या दोन्ही (प्रकारच्या निद्रा) नष्ट झाल्या आहेत.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy