________________
५५२
टीपा
४०२ श्लोक १ :- शुक्राचार्य म्हणतात हे बलिराजा! हा कसला याचक आहे?
हे मी तुला सांगितले होते. मूर्खा! हा असला तसला कोणी नसून, हा असला स्वत: नारायण आहे.
येथे केहउ, जेह, तेहु यामध्ये एह आदेश आहे. (पहिल्या ओळीतील) एह -- एहो (सू.४.३६२) मधील ओ ह्रस्व झाला आहे.
४०४ श्लोक १ जर तो प्रजापती कोठून तरी शिक्षण मिळवून (प्रजा) निर्माण
करीत असेल, तर या जगात येथे तेथे (म्हणजे कुठेही) तिच्यासारखी कोण आहे, ते सांग.
येथे जेत्थु, तेत्थु यामध्ये 'त्र' ला एत्थु आदेश झाला आहे. तहि - - तहे (सू.४.३५९) मधील ए ह्रस्व झाला आहे. सारिक्खु -- सादृक्ष्य (सू.२.१७).
४०५ केत्थु....जगि -- येथे केत्थु, जेत्थु, तेत्थु यांमध्ये 'त्र' ला एत्थु आदेश
आहे.
४०६ अपभ्रंशे....भवन्ति -- या नियमाप्रमाणे जाम-ताम, जाउं-ताउं, जामहिं
तामहिं अशी वर्णान्तरे होतात. मग सू.४.३९७ नुसार म चा वँ होऊन, जावँ, तावँ इत्यादी वर्णान्तरे होतात. श्लोक १ :- जोपर्यंत सिंहाच्या पंजाचा तडाका गंडस्थळावर पडला नाही, तोपर्यंतच पावलो पावली सर्व मदोन्मत्त हत्तींचा नगारा वाजत असतो.
येथे जाम-ताम मध्ये ‘म' आदेश आहे. श्लोक २ :- जोपर्यंत तेल काढलेले नाही तोपर्यंत तिळांचे तिळपणे (असते); तेल निघून जाताच तिळ तिळ न रहाता खल (पेंड, दुष्ट) होतात.
येथे जाउं-ताउं मध्ये 'उ' आदेश आहे. पणट्ठइ -- पणट्ठ पुढे सू.४.४२९ नुसार स्वार्थे अ आला आहे. जि -- जि (सू.४.४२०) चे द्वित्व आले आहे. फिट्टवि -- सू.४.४३९. फिट्ट हा भ्रंश् धातूचा आदेश आहे (सू.४.१७७).