________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
श्लोक ३ :- जेव्हा जीवावर विषम कार्यगती येते, तेव्हा इतर जन राहू देत (पण) सुजनसुद्धा अंतर देतो.
येथे जामहि -तामहिमध्ये 'हिं' आदेश आहे.
४०७ अत्वन्तयोः -- सू.२.१५६-१५७ वरील टीप पहा. जेवडु....गामहँ --
जितके अंतर राम व रावण यांत, तितके अंतर नगर व गाव यांत (असते). -- येथे जेवडु-तेवडु मध्ये एवड असा आदेश आहे. जेवडु तेवडु -- (म) जेवढेतेवढे ; (गु) जेवडुं-तेवडं. जेत्तुलो, तेत्तुलो -- जेत्तिल-तेत्तिल (सू.२.१५७) मध्ये स्वरभेद होऊन (सू.४.३२९) जेत्तुल-तेत्तुल असे वर्णान्तर झाले आहे.
४०८ एवडु केवडु -- (म) एवढा, केवढा. एत्तुलो केत्तुलो -- एत्तिल
केत्तिल (सू.२.१५७) मध्ये भिन्न स्वर येऊन, एत्तुल केत्तुल हे वर्णान्तर झाले.
४०९ श्लोक १ :- परस्पराशी लढणाऱ्यांपैकी ज्यांचा स्वामी पीडित झाला, त्यांना वाढलेले अन्न (श-मूग) वाया गेले.
येथे अवरोप्परु मध्ये आदि अकार आला आहे. मुग्गडा -- सू.४.४२९. जोहन्ताहं -- याचे ऐवजी जोअन्ताहं हा पाठ डॉ. वैद्यांनी स्वीकारलेला आहे. गजिउ -- (म) गांजणे; गांजलेला.
४१० उच्चारणस्य लाघवम् -- ए आणि ओ यांचे ह्रस्व उच्चार, त्यांचे ऐवजी
इ आणि उ लिहून किंवा त्यांच्या डोक्यावर हे चिन्ह देऊन (एँ, ओ') दाखविले जातात. उदा. सुघे हा ह्रस्व उच्चार सुघि असा सू. ४.३९६.२ मध्ये दाखविला आहे. दुल्लहहोमध्ये 'ओ' चा उच्चार ह्रस्व आहे.
४११ उं हुं....लाघवम् -- या अनुस्वारान्तांचे उच्चार-लाघव होऊन त्यांचा
होणारा सानुनासिक उच्चार या चिन्हाने दाखविला जातो. उदा. उँ, हुँ