________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५५१
येथे आवइ मध्ये दकाराचा इकार झाला आहे. आवइ -- आपद्. आवइ -- आयाति. गुणहि ....पर -- येथे संपय मध्ये द चा इ झालेला नाही.
४०१ श्लोक १ :- दुष्ट दिवस कसा संपेल ? रात्र लवकर कशी होईल ? आपल्या नव वधूला भेटण्यास उत्सुक झालेला तो (असे) मनोरथ करतो.
येथे कथम् ला केम' आणि 'किध' आदेश झालेले आहेत. समप्पउ -- सू. ३.१७३. छुडु -- (दे) शीघ्र, लवकर. श्लोक २ :- मला वाटते (ओ) - सुंदरीच्या मुखाने जिंकल्याने चंद्र ढगांआड दडत आहे. ज्याचे शरीर पराभूत झाले आहे, असा दुसरा कोणीही नि:शंकपणे कसा बरे हिंडेल ?
येथे कथम् शब्दाला किम (किवँ) आदेश आहे. ओ -- सू.२.२०३. भवँइ -- भ्रमति मध्ये सू.४.३९७ नुसार म चा वॅ झाला.
श्लोक ३ :- आनंदा! सुंदरीच्या बिंबाधरावर दंतव्रण कसा (राहिलेला) आहे? (उत्तर-) उत्कृष्ट रस पिऊन प्रियकराने जणु उरलेल्यावर मुद्रा केली आहे. __ येथे कथम् शब्दाला किह असा आदेश झाला आहे. पिअवि -- सू.४.४३९ जणु -- सू.४.४४४.
श्लोक ४ :- सखी! माझा प्रियकर मजशी सदोष असेल तर ते (तू) चोरून अशाप्रकारे (मला) सांग की त्याचे ठिकाणी पक्षपाती असणारे माझे मन त्याला कळणार नाही.
येथे तथा शब्दाला तेम (तेव) आणि यथा शब्दाला जेम (जेव) आदेश झाला आहे.
श्लोक ५ :- सू. ४.३७७.१ पहा. एवं....हार्यों -- जिध-तिध चे उदाहरण :- जिध तिध तोडहि कम्मु। (कुमारपालचरित - ८.४९).