________________
५४
प्रथमः पादः
(अनु.) दामन्, शिरस्, नभस् हे शब्द सोडून, इतर सकारान्त व नकारान्त शब्दांची
रूपे पुल्लिंगात योजावीत. उदा. सकारान्त (शब्द):- जसो...उरो. नकारान्त (शब्द) :- जम्मो...मम्मो. (सूत्रामध्ये) दामन्, शिरस्, नभस् (हे शब्द सोडून) असे का म्हटले आहे ? (कारण हे शब्द प्राकृतात नपुंसकलिंगातच वापरले जातात. उदा) दामं...नहं. आणि (वाङमयात) जी सेयं...चम्म अशी (नपुंसकलिंगी रूपे) आढळतात, ती बहुलच्या अधिकारामुळे आहेत (असे जाणावे).
(सूत्र) वाक्ष्यर्थ-वचनाद्याः ।। ३३।। (वृत्ति) अक्षिपर्याया वचनादयश्च शब्दाः पुंसि वा प्रयोक्तव्याः। अक्ष्यर्थाः।
अज? वि सा सवइ ते अच्छी। नच्चावियाइँ तेणम्ह अच्छीइं। अञ्जल्यादिपाठादक्षिशब्दः स्त्रीलिङ्गेऽपि। एसा अच्छी। चक्खू चक्खूइं। नयणा नयणाई। लोअणा लोअणाई। वचनादि।४ वयणा वयणाई। विजुणा विजूए। कुलो कुलं। छंदो छंद। माहप्पो माहप्पं। दुक्खा दुक्खाई। भायणा भायणाई। इत्यादि। इति वचनादयः। नेत्ता नेत्ताई। कमला कमलाई इत्यादि तु संस्कृतवदेव
सिद्धम्। (अनु.) अक्षि (=डोळा) शब्दाचे समानार्थी शब्द आणि वचन, इत्यादि शब्द
विकल्पाने पुल्लिंगात योजावेत. उदा. डोळा हा अर्थ असणारे शब्द :
अजवि...अच्छीइं. अक्षि हा शब्द अञ्जल्यादि-गणात येत असल्याने, १ अद्यापि सा शपति ते अक्षिणी। - अच्छी हे पुल्लिंगी रूप आहे.
नर्तितानि तेन अस्माकम् अक्षिणी। - अच्छीइं हे नपुं.रूप आहे. येथे अच्छी हे स्त्रीलिंगीरूप आहे, हे दर्शविण्यास एसा (एषा) हे एतद् सर्वनामाचे
स्त्रीलिंगी रूप वापरले आहे. ३ क्रमाने मूळ शब्द असे:- चक्षुस्,नयन, लोचन.- इथल्या जोड्यातील पहिले रूप
पुल्लिंगी व दुसरे नपुं. आहे. क्रमाने मूळ शब्द असे :- वचन, विद्युत्, कुल, छंदस्, माहात्म्य, दुःख, भाजन.
इथल्या जोड्यातील पहिले रूप पुल्लिंगी आहे. ५. नेत्र, कमल.