________________
प्राकृत व्याकरणे
स्थानी) त्याच वर्गाचे अन्त्य व्यंजन (=त्या वर्गाचे अनुनासिक) विकल्पाने होते. उदा. पङ्को....आरंभो. (सूत्रात) वर्गीय व्यंजन (पुढे असता) असे का म्हटले आहे ? (कारण वर्गीय व्यंजन पुढे नसेल तर त्या वर्गाचे अन्त्य व्यंजन विकल्पाने येत नाही. उदा.) संसओ, संहरइ. काही (वैयाकरणां) च्या मते, (हे वर्गीय अन्त्य व्यंजन विकल्पाने न येता) नित्य येते.
(सूत्र) प्रावृट्-शरत्तरणय: पुंसि ।। ३१।। (वृत्ति) प्रावृष् शरद् तरणि इत्येते शब्दाः पुंसि पुल्लिङ्गे प्रयोक्तव्याः। पाउसो।
सरओ। एस? तरणी। तरणिशब्दस्य पुंस्त्रीलिङ्गत्वे न
नियमार्थमुपादानम्। (अनु.) प्रावृष्, शरद् (आणि) तरणि हे शब्द पुंसि म्हणजे पुल्लिंगात वापरावेत.
उदा. पाउसो...तरणी. तरणि हा शब्द (संस्कृतमध्ये) पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असल्याने, (या सूत्रात तरणि शब्दाचा) निर्देश, हा शब्द (प्राकृतात) नियमितपणे (पुल्लिंगी) असतो, हे दर्शविण्यासाठी केला आहे.
(सूत्र) स्नमदामशिरोनभः ।। ३२।। (वृत्ति) दामन्शिरस्नभस्वर्जितं सकारान्तं नकारान्तं च शब्दरूपं पुंसि
प्रयोक्तव्यम्। सान्तम्। जसो। पओ। तमो। तेओ। उरो। नान्तम्। जम्मो३। नम्मो। मम्मो। अदामशिरोनभ इति किम् ? दामं। सिरं। नह। यच्च सेयं वयं सुमणं सम्मं चम्मं इति दृश्यते तद् बहुलाधिकारात्।
१
२ ३ ४
तरणी हे रूप पुल्लिंगी आहे, हे दाखविण्यास मागे एस (एषः) हे एतद् सर्वनामाचे पुल्लिंगी रूप वापरले आहे. क्रमाने मूळ शब्द असे :- यशस्, पयस्, तमस्, तेजस्, उरस् क्रमाने मूळ शब्द असे :-जन्मन्, नर्मन्, मर्मन्.. क्रमाने मूळ शब्द असे :- श्रेयस्, वचस्, (वयस्), सुमनस्, शर्मन्, चर्मन्.