________________
५४८
श्लोक २ :- सुंदरी ! गालावर ठेवलेले, श्वासरूपी अग्नीच्या ज्वाळांनी तापलेले व अश्रुजलाने भिजलेले कंकण आपण होऊनच चूर्ण होते आहे. येथे 'झलक्किअउ मधील झलक्क हा तापय् धातूचा आदेश आहे.
-
——
चूडुल्लउ
झलक्क
श्लोक ३ :- जेव्हा प्रेम (प्रिया) दोन पावले जाऊन परतले, तेव्हा सर्व खाणाऱ्या (अग्नी) चा जो शत्रु (म्हणजे पाणी, समुद्र), त्यापासून निर्माण झालेला जो चंद्र, त्याचे किरण परावृत्त होऊ लागले.
येथे ‘अब्भडवंचिउ’ मधील 'अब्भडवंच' हा अनुगम् धातूचा आदेश आहे. अब्भडवंचिउ सू.४.४३९. जावँ सू.४.४०६ नुसार यावत् चे जाम हे वर्णान्तर; मग सू. ४.३९७ नुसार जावँ. सव्वासणरिउसंभव सर्वाशन म्हणजे सर्वभक्षक अग्नी; येथे वडवानल; त्याचा शत्रु पाणी, येथे समुद्र; त्या समुद्रातून उत्पन्न झालेला चंद्र. तावँ सू. ४.४०६, ३९७.
सू.४.४२९-४३०. (म) झळकणे.
——
——
——
टीपा
——
श्लोक ४ :- हृदयात सुंदरी शल्याप्रमाणे ( त्रास देत) आहे; आकाशात मेघ गर्जत आहे; पावसाळ्यात प्रवासास निघणाऱ्यांना हे मोठे संकट आहे. येथे खुडुक्कइ हा शल्यायते याचा आणि घुडुक्कइ हा गर्जति धातूचा आदेश आहे. गोरडी - सू. ४.४२९, ४३१. खुडुक्कइ (म) खुडुक
होऊन बसणे.
●पवासुअ सू.१.४४. एहु सू.४.३६२
——
-
श्लोक ५ :आई ! (हे माझे) स्तन वज्रमय आहेत; (कारण) ते नेहमी माझ्या प्रियकरासमोर असतात व रणांगणावर गजसमूह नष्ट करण्यास जातात. येथे थन्ति मधील ‘था' हा स्था धातूचा आदेश आहे. भज्ज सू.४.४३९ नुसार होणारे हे पू.का.धा.अ. हे हेत्व. धा. अ. प्रमाणे वापरले आहे.
श्लोक ६ :- जर बापाची भूमी ( संपत्ती) दुसऱ्याकडून चापली / लाटली जात असेल तर पुत्र जन्मून काय उपयोग ? आणि तो मरून तरी काय तोटा?