________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५४७
येथे क्रियेचा कीसु आदेश आहे. साध्यमानावस्था -- सू.१.१ वरील टीप पहा.
३९० श्लोक १ :- स्तनांचे जे अतितुंगत्व (= अत्यंत उंची) ते लाभ नसून
तोटाच (छेदक:-हानि) आहे. (कारण) हे सखी! प्रियकर मोठ्या कष्टाने व विलंबाने (माझ्या) अधरापर्यंत पोचतो.
येथे पहुच्चइ मध्ये ‘भू' धातूला हुच्च आदेश आहे. हु -- सू.२.१९८.
३९१ ब्रुवह....किं पि -- येथे ब्रुवह या रूपात ब्रुव आदेश आहे.
श्लोक १ :- (श्रीकृष्णाच्या उपस्थितीने दुर्योधन किती गोंधळून गेला होता, त्याचे वर्णन या श्लोकात आहे :-) (दुर्योधन म्हणतो :-) इतके बोलून शकुनी थांबला; (तितकेच) बोलून दुःशासन थांबला; (मग) मला कळले की (बोलायचे ते) बोलून हा हरि (श्रीकृष्ण) माझ्यापुढे (उभा राहिला).
येथे ब्रू धातूची ब्रोप्पिणु आणि ब्रोप्पि अशी रूपे आहेत. इत्तउ -- इयत् ला सू.२.१५७ नुसार एत्तिअ आदेश; सू.१.८४ नुसार ए ह्रस्व झाला; ह्रस्व ए चे ऐवजी इ येऊन, इत्तिअ झाले; मग सू.४.३२९ नुसार इत्तउ झाले. ब्रोप्पिणु, ब्रोप्पि -- सू.४.४४०.
३९२ वुप्पि, वुप्पिणु -- सू.४.४४०. ३९४ गृण्हेप्पिणु -- सू.४.४४०. ३९५ श्लोक १ :- कसेही करून जर तीक्ष्ण किरण काढून (घेऊन) चंद्राला
तासला असता, तर या जगात गौरीच्या (सुंदरीच्या) मुखकमलाशी थोडेसे सादृश्य त्याला लाभले असते.
येथे छोल्लिज्जन्तु मध्ये छोल्ल हा तक्ष् धातूचा आदेश आहे. छोल्लिज्जन्तु -- छोल्ल (म-सोलणे) च्या कर्मणि अंगापासूनचे व.का.धा.वि. सरिसिम -- सू.२.१५७ नुसार भाववाचक नाम.