________________
५४६
टीपा
येथे सुमरि, मेल्लि, चरि या द्वि.पु.ए.व. मध्ये इ आदेश आहे. म -- मा (सू.४.३२९). जि -- सू.४.४२०.
श्लोक २ :- हे भ्रमरा! दाट पाने व छाया असणारा कदंब (वृक्ष) फुलेपर्यंत या लिंबाचे वृक्षावर काही दिवस काढ.
येथे विलम्बु या द्वि.पु.ए.व. मध्ये उ आदेश आहे. एत्थु -- सू.४.४०४. लिम्बडइ -- लिंब ला सू.४.४२९-४३० नुसार स्वार्थे प्रत्यय लागले आहेत. दियहडा -- सू.४.४२९ नुसार दियह शब्दाला अड हा स्वार्थे प्रत्यय लागला. जाम -- सू.४.४०६.
श्लोक ३ :- प्रियकरा! आता हातात भाला ठेव, तलवार टाकून दे. म्हणजे (गरीब) बिचाऱ्या कापालिकांना (निदान) न फुटलेले कपाल (तरी भिक्षापात्र म्हणून) मिळेल.
येथे करे या द्वि.पु.ए.व. मध्ये ए असा आदेश आहे. एम्वहिं -- सू.४.४२०. सेल्ल -- (दे) भाला. बप्पुडा -- (म) बापुडा, बापडा.
३८८ स्यस्य -- ‘स्य' चे. संस्कृतात स्य हे भविष्यकाळाचे चिन्ह आहे.
श्लोक १ :- दिवस झटपट जातात; मनोरथ मागे पडतात; (म्हणून) जे आहे ते स्वीकारावे (श- मानावे); ‘होईल' असे म्हणत (स्वस्थ) बसू नको. __ येथे होसइ या रूपात ‘स' झाला आहे. झडप्पडहिं -- (म) झटपट. पच्छि -- सू.२.२१ नुसार पच्छा; सू.४.३२९ नुसार पच्छि. करतु -- सू.३.१८१ नुसार करंतु; मग अनुस्वार लोप होऊन करतु रूप झाले.
३८९ क्रिये -- कृ धातूचे कर्मणि वर्तमानकाळ प्र.पु.ए.व.
श्लोक १ :- असणाऱ्या भोगांचा त्याग करणाऱ्या त्या प्रियकराची मी पूजा करते. ज्याच्या डोक्याला टक्कल पडले आहे, त्याचे मुंडन दैवानेच केले आहे.