SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 546
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद ५४५ येथे दिजहि या विध्यर्थी द्वि.पु.ए.व. मध्ये हि आदेश आहे. आयहि -- इदम् च्या आय अंगापासूनचे (सू.४.३६५) स.ए.व. (सू.४.३५७). अन्नहिं -- सू.४.३५७. जम्महि -- सू.४.३४७. गय -- सू.४.३४५. अब्भिड -- सङग धातूचा आदेश आहे (सू.४.१६४). ३८४ मध्यम....वचनम् -- सू.३.१४३ वरील टीप पहा. श्लोक १ :- बलीजवळ याचना करताना, तो विष्णु (मधुमथन) सुद्धा लघु झाला. (तेव्हा) जर मोठेपणा हवा असेल तर (दान) द्या; (पण) कुणाजवळही (काहीही) मागू नका. येथे इच्छहु या द्वि.पु.अ.व. मध्ये हु आदेश आहे. ३८५ अन्त्य....वचनम् -- सू.३.१४१ वरील टीप पहा. श्लोक १ :- दैव विन्मुख असो, ग्रह पीडा देवोत ; सुंदरी विषाद करू नको. जर व्यवसाय करीन, तर वेषाप्रमाणे (मी) संपदा ओढून आणीन. येथे कड्ढउँ या प्र.पु.ए.व. मध्ये उं आदेश आहे. करहि -- सू.३.१७४. संपइ -- सू.४.४00. छुडु -- यदि (सू.४.४२२). ३८६ श्लोक १ :- प्रियकरा जेथे तरवारीला काम मिळेल त्या देशी जाऊ या. रणरूपी दुर्भिक्षाने आपण पीडित आहोत; युद्धा विना आपण (सुखी) राहू शकणार नाही. येथे लहहुं, जाहुं, वलाहुं या प्र.पु.अ.व. मध्ये 'हु' आदेश आहे. सू. ४.३८२-३८६ मध्ये अपभ्रंशातील वर्तमानकाळाचे प्रत्यय असे :पुरुष अ.व. प्र.पु. द्वि.पु. तृ.पु. ३८७ पञ्चम्याम् -- आज्ञार्थामध्ये. श्लोक १ :- हे हत्ती! सल्लकी (वृक्षा) ची आठवण करू नको; दीर्घ सुस्कारे सोडू नको; दैववशात् मिळालेले घास खा; (पण) मान सोडू नको. ए.व. "nch nchi
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy