________________
५४४
टीपा
तेव्हा येथे राजन्ते असाही संस्कृत प्रतिशब्द होईल. कुरल -- (म) कुरळे. खेल्ल -- (म) खेळणे.
३८३ मध्य....वचनम् -- सू.३.१४० वरील टीप पहा.
श्लोक १ :- (या श्लोकात पिउ शब्द श्लिष्ट आहे. स्त्रीचे बाबतीत प्रियः (प्रियकर) व चातकाचे बाबतीत पिबामि (पितो) या अर्थांनी तो वापरलेला
आहे :-) हे चातका! पिईन पिईन असे म्हणत, अरे हताशा! तू किती रडणार (श- रडतोस) ? (आपणा) दोघांचीही - तुझी पाण्याविषयीची व माझी वल्लभाविषयीची - आशा पूर्ण झाली नाही.
येथे रुअहि या द्वि.पु.ए.व. मध्ये 'हि' आदेश आहे. बप्पीह -- चातक पक्षी. हा फक्त मेघातून पडणारे पाणी पितो, भूमीवरील पाणी पीत नाही, असा कविसंकेत आहे. भणवि -- सू.४.४३९. कित्तिउ -- सू.२.१५७ नुसार कियत् ला केत्तिअ आदेश होतो; सू.१.८४ नुसार के मधील ए ह्रस्व होतो; त्याचे स्थानी इ येऊन, कित्तिअ असे होते.
श्लोक २ :- हे निघृण चातका! वारंवार तुला सांगून काय उपयोग की विमल जलाने भरलेल्या सागरातून तुला एक थेंब (शधारा) सुद्धा पाणी मिळणार नाही.
येथे लहहि या द्वि.पु.ए.व. मध्ये हि आदेश आहे. कई -- किम् ला सू.४.३६७ नुसार काई आदेश झाला आणि सू.४.३२९ नुसार स्वरात बदल होऊन कइँ असे झाले. बोल्लिअ -- बोल्ल (कथ् धातू चा आदेशसू.४.२) चे क.भू.धा.वि. इ -- हे पादपूरणार्थी अव्यय आहे (सू.२.२१७). भरिअइ -- भरिअ या क.भू.धा.वि. पुढे सू.४.४२९ नुसार स्वार्थे अ प्रत्यय आला आहे. एक्क इ -- एकाम् अपि. येथे ‘अपि' मधील आद्य अ आणि प् यांचा लोप झाला आहे. सप्तम्याम् -- विध्यर्थामध्ये.
श्लोक ३ :- हे गौरी! या जन्मात तसेच अन्य जन्मांत (मला) तोच प्रियकर द्यावा की जो हसत हसत माजलेल्या व अंकुशाला न जुमानणाऱ्या हत्तींशी भिडतो.