________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५४३
A.alah
तुम्हेहिं
तुम्हहं
#. .N.
सू.३६८-३८१ मध्ये आलेला युष्मद्-अस्मद् सर्वनामांचा रूपविचार येथे एकत्र करून दिला आहे.
युष्मद् विभक्ती ए.व.
अ.व. तुहुँ
तुम्हे, तुम्हइं पई, तई
तुम्हे, तुम्हइं पइं, तई तउ, तुज्झ, तुध्र तुम्हहं तउ, तुज्झ, तुध्र पई, तई
तुम्हासु अस्मद
अम्हे, अम्हइं अम्हे, अम्हइं
अम्हेहिं महु, मज्यु
अम्हह महु, मज्झु
अम्हहं
अम्हासु ३८२-३८८ या सूत्रांत अपभ्रंशातील धातुरूपविचार आहे. माहाराष्ट्री प्राकृतापेक्षा
जे वेगळे आहे, तेवढेच येथे सांगितले आहे. ३८२ त्यादि -- सू.१.९ वरील टीप पहा. आद्यत्रयस्य....वचनस्य --
सू.३.१४२ वरील टीप पहा. श्लोक १ :- तिचे मुख आणि केशबंध (अशी) शोभा धारण करतात की जणु चंद्र व राहु मल्लयुद्ध करीत आहेत. भ्रमरांच्या समुदायाशी तुल्य अशा तिच्या कुरळ्या केसांच्या बटा (अशा) शोभतात की जणु अंधकाराची पिल्ले एकत्र येऊन क्रीडा करीत आहेत.
येथे धरहिं, करहिं, सहहिँ या तृ.पु.अ.व. मध्ये 'हिं' आदेश आहे. नं -- सू.४.४४४. सहहिँ-- सह हा राज् धातूचा आदेश आहे (सू.४.१००).
A.