________________
५४२
टीपा
काहीतरी आधार (अवलंबन, दुःखनिवृत्ति, धरा) मिळतो; पण प्रलयकाली जसा सूर्य, तसाच चंद्र (यावेळी) ताप देत आहे.
येथे अस्मद् च्या तृ.ए.व.मध्ये मइँ आदेश आहे. णवर -- सू.२.१८७. तिह, जिह -- सू.४.४०१. पई....गयहिं -- येथे अस्मद् च्या स.ए.व. मध्ये मई आदेश आहे. मइं....तुज्झु -- येथे अस्मद् च्या
द्वि.ए.व. मध्ये मई आदेश आहे. ३७८ तुम्हहि ....किअउँ -- येथे अस्मद् च्या तृ.अ.व.मध्ये अम्हेहिं असा
आदेश आहे.
३७९ श्लोक १ :- माझ्या प्रियकराचे दोन दोष आहेत; सखी! आरोप दडवू
नको. जेव्हा तो दान देतो तेव्हा फक्त मी उरते; आणि जेव्हा तो लढतो, तेव्हा फक्त तरवार उरते.
येथे अस्मद् च्या ष.ए.व. मध्ये महु आदेश आहे. हेल्लि -- सू.४.४२२. झलहि -- येथे झंख हा विलय् धातूचा (सू.४.१४८) आदेश घेऊन, 'खोटे बोलू नको' असाही अर्थ करता येईल. आलु -- (म) आळ.
श्लोक २ :- सखी! जर शत्रूचा पराभव झाला असेल, तर तो माझ्या प्रियकराकडून; जर आपला पराभव झाला असेल, तर तो (=माझा प्रियकर) मारला गेल्यावरच.
येथे अस्मद् च्या ष.ए.व. मध्ये मज्झु आदेश आहे. पारक्कडा -- परकीय शब्दाला सू.२.१४८ नुसार पारक्क आदेश; त्याचे पुढे सू.४.४२९ नुसार अड हा स्वार्थ प्रत्यय येऊन, पारक्कड शब्द बनला. मारिअडेण -- मारिअ पुढे सू.४.४२९ नुसार अड हा स्वार्थे प्रत्यय आला.
३८० अम्हहं....आगदो -- येथे अस्मद् च्या पं.अ.व. मध्ये अम्हह आदेश
आहे. अह....तणा -- येथे अस्मद् च्या ष.अ.व. मध्ये अम्हह आदेश आहे.