________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५२५
दिअहडा -- सू. ४.४२९. दइएँ, पवसंतेण, नहेण -- सू. ४.३४२. गणन्तिएँ -- सू. ३.२९. अंगुलिउ, जजरिआउ -- सू.४.३४८. ताण -- हे माहाराष्ट्री प्राकृतात ष.अ.व. चे रूप आहे. येथे त्याचा उपयोग द्वितीये ऐवजी (सू. ३.१३४) केला आहे.
४.३३४ श्लोक १ :- सागर गवताला वर (उचलून) धरतो आणि रत्नांना
तळात ढकलतो. (तद्वत्) स्वामी चांगल्या सेवकाला सोडून देतो आणि खलांचा (दुष्टांचा) सन्मान करतो.
येथे तलि या स.ए.व.मध्ये अकाराचा इकार झाला आहे. तले घल्लइ -- येथे तले या स.ए.व. मध्ये अकाराचा एकार झाला आहे. उप्परि -- उपरि मध्ये प चे द्वित्व झाले आहे. खलाई -- सू. ४.४४५
४.३३५
श्लोक १ :- गुणांनी कीर्ती मिळते, पण संपत्ती मिळत नाही; (दैवाने भाळी) लिहिलेली फळेच (लोक) भोगतात. सिंहाला एक कवडी सुद्धा मिळत नाही; पण हत्तींना लाखो रुपये पडतात (श-हत्ती लाखो रुपयांनी विकत घेतले जातात). __ येथे लक्खेहिं या तृ.अ.व. मध्ये अकाराचा एकार झाला आहे. गुणहिँ मध्ये अकाराचा एकार झालेला नाही. गुणहिँ, लक्खेहिं - - हिं-हिं हे प्राकृतातील तृ.अ.व. चे प्रत्यय आहेत (सू. ३.७). अपभ्रंशातील तृ.अ.व. प्रत्ययांसाठी सू. ४.३४७ पहा. पर -- परम्. बोड्डिअ -- (दे) कवडी. घेप्पन्ति -- सू. ४.२५६.
४.३३६
अस्येति....णम्यते -- सू.३.२० वरील ‘इदुत....संबध्यते' यावरील टीप पहा. श्लोक १ :- लोक वृक्षाची फळे घेतात आणि कडु पाल्याचा त्याग करतात; तथापि सुजनाप्रमाणे महावृक्ष त्यांना मांडीवर धारण करतो.
येथे वच्छहे या पं.ए.व. मध्ये 'हे' आदेश आहे. वच्छहु गृण्हइ -- वच्छहु मध्ये हु आदेश आहे. गृण्हइ -- सू. ४.३९४. फलई