________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५२३
म्हणजे दीर्घ स्वर झाला आहे व धण आणि देह मध्ये आ चा अ म्हणजे ह्रस्व स्वर झाला आहे. ढोल्ल -- (दे) विट, नायक, प्रियकर. धण -- धन्या; प्रिया प्रियाया धण आदेशः। टीकाकार). नाइ - - सू. ४.४४४. कसवट्टइ -- सू. ४.३३४. श्लोक २ :- हे प्रिया! मी तुला सांगितले होते (श- निवारण केले होते) की दीर्घ काळ मान धरू नको; (कारण) झोपेत रात्र संपून जाईल आणि लगेच प्रभात (-काळ) होईल.
येथे संबोधनात ढोल्ला मध्ये अ चा आ म्हणजे दीर्घ स्वर झाला आहे. मइँ -- सू. ४.३७७. अपभ्रंशात अनेक अनुस्वार हे सानुनासिक उच्चारले जातात. ते अक्षरावरील या चिन्हाने दाखविले जातात. तुहुँ -- सू. ४.३६८. करु -- सू. ४.३८७. निद्दए -- सू. ४.३४९. रत्तडी -- सू.४.४२९,४३१. दडवड -- (दे) शीघ्र, झटपट. माणु, विहाणु -- सू. ४.३३१. श्लोक ३ :- मुली! मी तुला सांगितले होते की वक्र दृष्टी करू नको. (कारण) हे मुली! (ही वक्र दृष्टी) अणकुचीदार (धारदार) भाल्याप्रमाणे (दुसऱ्यांच्या) हृदयात प्रविष्ट होऊन, त्यांना ठार करते. __येथे स्त्रीलिंगात दिट्ठि, पइट्ठि, भणिय मध्ये दीर्घाचा ह्रस्व स्वर झाला आहे. बिट्टीए -- (म,हिं) बेटा, बेटी. जिवँ -- सू. ४.४०१, ३९७ . हिअइ -- सू. ४.३३४ . । श्लोक ४ :- हे ते घोडे; ही (ती युद्ध-) भूमी ; हे ते तीक्ष्ण खड्ग; जो घोड्यांचा लगाम (मागे) खेचीत नाही (तर रणक्षेत्रावर युद्ध करीत रहातो), येथे (त्याच्या) पौरुषाची परीक्षा होते.
येथे प्र.अ.व. मध्ये घोडा, णिसिआ यांमध्ये ह्रस्व स्वराचा दीर्घ स्वर झाला आहे आणि 'ति', खग्ग, वग्ग मध्ये दीर्घ स्वराचा ह्रस्व झाला आहे. एइ -- सू. ४.३६३. ति -- ते मधील ए ह्रस्व झाला आहे. एह -- सू. ४.३६२. एत्थु -- सू. ४.४०५.
४.३३१ श्लोक १ :- भुवनभयंकर असा रावण शंकराला संतुष्ट करून रथात