________________
५२२
४.३२५ वर्गाणाम् वर्गातील व्यंजनांचा. तुर्य व्याकरण नियमाने येणाऱ्या व्यंजनांच्या
चतुर्थ, चौथे.
४.३२६
——
४.३२८ प्राक्तनपैशाचिकवत् पैशाची भाषेप्रमाणे.
४.३३०
——
ताठा.
क्वचिल्लाक्ष.... ताठा बाबतीतही या सूत्रातील नियम क्वचित् लागू पडतो. उदा. प्रतिमापडिमा (सू.१.२०६)-पटिमा ; दंष्ट्रा - दाढा (सू. २.१३९) श्लोक १ :- प्रेमात रागावलेल्या पार्वतीच्या पायाच्या (दहा) नखांत ज्याचे प्रतिबिंब पडले आहे, (म्हणून) दहा नखरूपी आरशांत (पडलेली दहा व मूळचे एक अशी) अकरा रूपे (शरीरे) धारण करणाऱ्या शंकराला नमस्कार करा. या श्लोकात गोली, चलण, लुद्द मध्ये 'र' चा 'ल' झाला आहे.
——
टीपा
——
—
श्लोक २ :- नाचू लागला असताना, सहज टाकलेल्या ज्याच्या पावलांच्या आघाताने पृथ्वी थरथरली, समुद्र उसळले आणि पर्वत कोसळले, त्या शंकराला नमस्कार करा. या श्लोकात हल मध्ये र चा ल झाला आहे.
पूर्वी (सू. ३०३ - ३२४) सांगितलेल्या
४.३२९-४.४४६ या सूत्रांत अपभ्रंश भाषेचा विचार आहे. शौरसेनी इत्यादी भाषांपेक्षा हा विचार सविस्तर आहे. मुख्य म्हणजे येथे पद्य उदाहरणे फार मोठ्या प्रमाणात दिलेली आहेत.
४.३२९ संस्कृतमधून अपभ्रंशात शब्द येताना, त्यांत स्वरांचे स्थानी इतर स्वर येतात. उदा. पृष्ठ- पट्ठि, पिट्ठि, पुट्ठि; इत्यादी.
श्लोक १ :- प्रियकर शामल (वर्णी) आहे; प्रिया चंपक वर्णी आहे; ती कसोटीच्या (काळ्या) दगडावर ओढलेल्या सुवर्णाच्या रेषेप्रमाणे दिसते.
येथे प्र.ए.व. मध्ये ढोल्ला आणि सामला यामध्ये अ चा आ