________________
प्राकृत व्याकरणे
५१
अइमुंतयं या दोन शब्दांत तिसऱ्या स्वरानंतर (अनुस्वारागम झालेला दिसतो). (आत्तापर्यंत सांगितलेल्या शब्दांचे मूळ संस्कृत शब्द असे :-) वक्र... अतिमुक्तक, इत्यादि. क्वचित् छंदःपूरणासाठीही (अनुस्वारागम होतो. उदा.) देवं-नाग-सुवण्ण'. क्वचित् (वरील शब्दांत असा अनुस्वारागम) होत नाही. उदा. गिठ्ठी... मणासिला. आर्ष प्राकृतात (काही शब्दांची वर्णान्तरे अशी होतात:-) मणोसिला, अइमुत्तयं.
(सूत्र) क्त्वास्यादेर्णस्वोर्वा ।। २७॥ (वृत्ति) क्त्वाया: स्यादीनां च यौ णसू तयोरनुस्वारोऽन्तो वा भवति। क्त्वा।
काऊणं काऊण। काउआणं काउआण। स्यादि। वच्छेणं वच्छेण।
वच्छेसुं वच्छेसु। णस्वोरिति किम् ? करिअ५। अग्गिणो। (अनु.) क्त्वा (हा प्रत्यय) आणि विभक्ति प्रत्यय, यांमध्ये जे ‘ण' आणि 'सु'
येतात, त्यांचे अन्ती विकल्पाने अनुस्वार येतो. उदा. क्त्वा-प्रत्ययात :काऊणं...काउआण. विभक्तिप्रत्ययांत :- वच्छेणं... वच्छेसु. (सूत्रामध्ये) ण आणि सु (यांचेवर अनुस्वार येतो) असे का म्हटले आहे ? (कारण या प्रत्ययांत जेथे ण आणि सु नसतात तेथे अनुस्वार येत नाही. उदा. करिअ; अग्गिणो.)
(सूत्र) विंशत्यादेर्लुक् ।। २८।। (वृत्ति) विंशत्यादीनां अनुस्वारस्य लुग् भवति। विंशति: वीसा। त्रिंशत् तीसा।
__ संस्कृतम् सक्कयं। संस्कारः सक्कारो इत्यादि। (अनु.) विंशति, इत्यादि शब्दांतील अनुस्वाराचा लोप होतो. उदा. विंशति...सक्कारो,
इत्यादि.
१ देवनाग सुवर्ण २ काऊणं... काउआण ही कर धातूची पू.का.धा. अव्ययाची रूपे आहेत ३ वच्छ शब्दाचे तृतीया एकवचन ४ वच्छ चे सप्तमी अनेकवचन ५ कर धातूचे पू.का.धा.अ. ६ अग्गि (अग्नि) शब्दाचे प्रथमा अ.व. इत्यादीचे रूप. सू.३.२३ पहा