________________
५१८
टीपा
तालव्यशकार -- तालु या उच्चारणस्थानातून उच्चारला जाणारा शकार. श्लोक १ -- गडबडीने नमन करणाऱ्या देवांच्या मस्तकावरून गळून पडलेल्या मंदार फुलांनी ज्याचे पदयुगुल सुशोभित झाले आहे, असा (तो) जिन (महा-) वीर माझे सर्व पाप-जंजाळ धुवून टाकू दे.
या श्लोकात लहश, नमिल, शुल, शिल, मन्दाल, लायिद, वील, शयल या शब्दांत र आणि स यांचा ल आणि श झाला आहे. वीलयिण -- जिन महावीर. जैन धर्म प्रगट करणारे चोवीस जिन (तीर्थंकर) आहेत. राग इ. विकार जिंकणारा तो जिन. वीर शब्द येथे महावीर शब्दाचा संक्षेप आहे. महावीर हे जैनांचे २४ वे तीर्थंकर मानले जातात. यिणे, ग्यम्बालं -- ज च्या य साठी सू. ४.२९२ पहा. अवय्य -- सू. ४.२९२ पहा.
४.२८९-४.२९८ या सूत्रांत मागधीतील संयुक्त व्यंजनांचा विचार आहे. त्यावरून
हे स्पष्ट होते की माहाराष्ट्रीत न चालणारी स्ख, स्न, स्प, स्ट, स्त, श्च, स्क, ष्ठ आणि ञ ही जोडाक्षरे मागधीत चालतात.
४.२९२
अय्युणे....गय्यदि, °वय्यिदे -- येथे प्रथम जे चा ज होऊन मग य्य झाला.
४.२९३ द्विरुक्तो ञः -- द्वित्वयुक्त ञ म्हणजे च.
४.२९५ तिरिच्छि -- सू.२.१४३. पेस्कदि -- सू. ४.२९७
४.२९६ जिह्वामूलीयः -- सू. २.७७ वरील टीप पहा.
४.२९८ स्थाधातो....त्यादेश: -- स्था धातूला तिष्ठ असा आदेश हेमचंद्राने
सांगितलेला नाही.