________________
टीपा
मध्ये भवान् आणि भगवान् अशी रूपे संस्कृतात होतात. समणे, महावीरे, पागसासणे -- ही प्र.ए.व. ची रूपे सू. ४.२८७ नुसार आहेत. संपाइअवं, कयवं -- संपादितवान्, कृतवान्. क.भू.धा.वि. ला वत् प्रत्यय जोडून बनलेली कर्तरि रूपे.
४.२६६ पक्षे -- र्य चा य्य न झाल्यास, विकल्पपक्षी माहाराष्ट्री (प्राकृत)
प्रमाणे र्य चा ज होतो.
४.२६७ अनादि, असंयुक्त थ चा ध होणे, हे शौरसेनीचे एक वैशिष्ट्य आहे.
४.२७० पक्षे -- विकल्पपक्षी माहाराष्ट्री (प्राकृत) प्रमाणे अपुव्व असे वर्णान्तर
होते.
४.२७१
इय दूण -- माहाराष्ट्रीत क्त्वा चा 'अ' आदेश आहे (सू.२.१४६); तत्पूर्वी सू.३.१५७ नुसार धातूच्या अन्त्य अ चा इ होतो. या दोन्हींच्या संयोगाने इय (इअ) बनलेला दिसतो. माहाराष्ट्रीतील क्त्वा च्या तूण आदेशाचा दूण होतो असे म्हणता येते. भोत्ता....रन्ता -- या रूपात अभिप्रेत असणारा क्त्वाचा ‘त्ता' आदेश हेमचंद्राने स्वतंत्रपणे सांगितलेला नाही.
४.२७३-२७४ वर्तमानकाळी तृ.पु.ए.व. चे दि आणि दे हे प्रत्यय आहेत.
४.२७३ त्यादीनां....द्यस्य -- सू.३.१३९ वरील टीप पहा.
४.२७५ स्सि -- ही शौरसेनीत भविष्यकाळाची खूण आहे.
४.२७६
य्येव -- सू. ४.२८०.