________________
५१४
टीपा
तसेच, कृ हा व्यंजनान्त धातू नाही. त्यामुळे कुण हे उदाहरण येथे योग्य दिसत नाही. हरइ, करइ -- हृ आणि कृ धातूपासून हर व कर होतात (सू. ४.२३४). ह आणि कृ हे धातू व्यंजनान्तही नाहीत. त्यामुळे ही उदाहरणे येथे योग्य दिसत नाहीत. शबादीनाम् -- शप्+आदीनाम्.
४.२४० चिइच्छइ -- सू.२.२१. दुगुच्छइ -- सू.४.४
४.२४१ एषां....ह्रस्वो भवति -- पुढे ‘ण' आल्यावर, मागील स्वर दीर्घ
असल्यास, तो ह्रस्व होतो. उदा. लू - लुण. उच्चिणइ उच्चेइ -- येथे उद् हा उपसर्ग आहे.
४.२४२ द्विरुक्तो वकारागमः -- म्हणजे 'व्व' चा आगम. क्यस्य लुक् -
- क्य या प्रत्ययाचा लोप. क्य प्रत्ययासाठी सू.३.१६० पहा.
४.२४३ संयुक्तो म: -- म्हणजे म्म.
४.२४४
द्विरुक्तो म: -- म्हणजे म्म. हन्ति -- हे हन् धातूचे कर्तरि रूप आहे. हन्तव्वं, हन्तूण, हओ -- हन् धातूची अनुक्रमे वि.क.धा.वि., पू.का.धा.अ. आणि क.भू.धा.वि. आहेत.
४.२४५ द्विरुक्तो भ: -- ब्भ असे द्वित्व
४.२४६ द्विरुक्तो झः -- ज्झ असे द्वित्व.
४.२५१ विढविजइ -- विढव हा अर्ज चा आदेश आहे (सू.४.१०८).
४.२५२ जाण, मुण हे ज्ञा धातूचे आदेश आहेत (सू.४.७).