________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५१३
४.२२८
खाइ -- (म) खाणे. खाअइ -- सू.४.२४० नुसार खा पुढे अ आला. खाहिइ खाउ -- खा धातू ची भविष्यकाळ व आज्ञार्थ यांची रूपे. धाइ धाहिइ धाउ -- धा ची क्रमाने वर्तमानकाळ, भविष्यकाळ व आज्ञार्थ धातू रूपे.
४.२३०
परिअट्टइ -- अट्ट चे परि हा उपसर्ग आहे. पलोट्टइ -- येथे प (प्र) हा उपसर्ग आहे.
४.२३१ फुट्टइ -- (म) फुटणे.
४.२३२
पमिल्लइ.... उम्मीलइ -- येथे प्र, नि, सम, उद् हे उपसर्ग आहेत.
४.२३३
निण्हवइ, निहवइ -- येथे नि हा उपसर्ग आहे. पसवइ -- येथे प्र हा उपसर्ग आहे.
४.२३४ ऋवर्ण -- ऋ व ऋ हे स्वर.
४.२३७
युवर्ण -- सू.१.६ वरील टीप पहा. क्ङित्यपि....भवति -- क्ङित् म्हणजे कित् आणि ङित् प्रत्यय, ज्यातील क् आणि ङ् इत् आहेत असे प्रत्यय. संस्कृतात या प्रत्ययांच्या मागे असणाऱ्या इ आणि उ या वर्णांचा गुण वा वृद्धि होत नाही. पण प्राकृतात मात्र हे प्रत्यय पुढे असतानाही मागील इ आणि उ वर्णांचा गुण होतो.
४.२३८
हवइ -- सू.४.६० पहा. चिणइ -- सू.४.२४१ पहा. रुवइ रोवइ -- सू.४.२२६ पहा.
४.२३९ व्यंजनान्त धातूंच्या अन्ती अ येऊन ते अकारान्त होतात. कुणइ -
- कुण हा कृचा धात्वादेश म्हणून सू.४.६५ मध्ये सांगितला आहे.