________________
प्राकृत व्याकरणे-चतुर्थ पाद
५०९
४.१२१ घुसल -- (म) घुसळणे. ४.१२२ इकारो....ग्रहार्थः -- सूत्रात लाद् धातूला इकार जोडून ह्लादि
शब्द वापरला आहे. हा इकार येथे सू.४.१ प्रमाणे इत् म्हणून वापरलेला नाही, तर प्रयोजक प्रत्ययान्त ह्लाद् धातूचेही येथे ग्रहण होते, हे दाखविण्यास इकार वापरला आहे.
४.१२५
अच्छिन्दइ -- सू. ४.२१६ नुसार आच्छिद् चे वर्णान्तर आच्छिन्द होते; सू. १.८४ नुसार आ चा ह्रस्व होऊन अच्छिन्दइ होते.
४.१२६ मलइ -- (म) मळणे.
४.१२७
चुलुचुल -- (म) चुरुचुरु (बोलणे).
४.१३०
झडइ -- (म) झडणे. येथे शद् (१ प.) शीयति हा धातु आहे.
४.१३६ जाअइ -- सू. ४.२४० नुसार जा पुढे अ आला आहे.
४.१३७ विरल्लइ -- (म) विरळ होणे.
४.१३९ कृतगुणस्य -- ज्यात गुण केलेला आहे. इ-ई, उ-ऊ, ऋ-ऋ, लु
यांचे अनुक्रमे ए, ओ, अर्, अल् होणे म्हणजे गुण होणे.
४.१४३ ह्रस्वत्वे -- सू. १.८४ नुसार स्वर ह्रस्व झाला असताना.
४.१४५
अक्खिवइ -- सू.४.२३९ नुसार आक्षिप् च्या अन्ती अ येऊन झालेल्या आक्खिव वर्णान्तरात सू.१.८४ नुसार आ चा ह्रस्व होऊन अक्खिव हे वर्णान्तर होते.