________________
५१०
टीपा
४.१४६
-- (हिं) लेटना.
४.१४८
वडवड -
-- (म) बडबड, बडबडणे
४.१४९ लिम्प -- (म) लिंपणे.
४.१५२ पलीवइ -- सू. १.२२१ नुसार प्रदीप् मध्ये द चा ल होतो.
४.१५७
जम्भाअइ -- सू. ४.२४० नुसार जम्भा पुढे अ आला.
४.१६०
अक्कमइ -- सू. ४.२३९ व १.८४ नुसार हे वर्णान्तर होते.
४.१६२ हम्मइ....भविष्यन्ति -- 'हम्म गतौ' या धातुपाठानुसार 'जाणे'
या अर्थी हम्म् धातु आहे. त्यापासून हम्मइ इ. रूपे होतील.
४.१७०
तुवरन्तो जअडन्तो -- तुवर, जअड यांची व.का.धा.वि.
४.१७१ त्यादौ शतरि -- धातूंना लागणारे प्रत्यय (त्यादि) व शतृ प्रत्यय
पुढे असताना. शतृ प्रत्ययासाठी सू.३.१८१ पहा. तुरन्तो -- तूर धातूचे व.का.धा.वि.
४.१७२
अत्यादौ -- (शब्दातील) आदि अ (अत्) पुढे असताना. उदा. तूर+अन्त = तुरन्त. तुरिओ -- ‘तुर' चे क.भू.धा.वि.
४.१७३
खिरइ, झरइ, पज्झरइ -- (म) खिरणे, झरणे, पाझरणे.
४.१७७ फिट्टइ, चुक्कइ, भुल्लइ -- (म) फिटणे, चुकणे, भुलणे.