SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 506
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ चतुर्थ पाद या पादात प्रारंभी धात्वादेश सांगितले आहेत. नंतर शौरसेनी इ. भाषांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. धात्वादेशांत मूळ धातू व प्रयोजक धातू यांचे आदेश दिलेले आहेत. या धात्वादेशांतील काही संपूर्ण देशी आहेत, तर झा, गा (सू.४.६), ठा (सू.४.१६), अल्ली (सू.४.५४), धुव (सू.४.५९) इ. काहींचा संस्कृतशी संबंध जोडता येतो. ४.१ इदितः -- ज्यातील इ इत् आहे. उदा. कथि (कथ्+इ). प्रायः सर्व धात्वादेश वैकल्पिक आहेत. ४.२ बोल्ल -- (म) बोलणे. एते चान्यै....प्रतिष्ठन्तामिति -- इतर वैयाकरणांनी धात्वादेश हे देशी शब्द मानले आहेत. पण ते धात्वादेश म्हणून येथे देण्याचे कारण हेमचंद्र असे सांगतो :- इतर धातूंप्रमाणेच या धात्वादेशांनाही भिन्न-भिन्न प्रत्यय लागून त्यांची भिन्न-भिन्न रूपे सिद्ध व्हावीत आणि तशी ती होतातही. उदा. वज्जर पासून वजरिओ (क.भू.धा.वी), वज्जरिऊण (पू.भा.धा.अ.), वज्जरणं (नाम), वज्जरन्त (व.का.धा.वी), वज्जरिअव्वं (वि.क.धा.वी) इ. ४.४ गलोपे -- धात्वादेशातील ग चा लोप सू. १.१७७ नुसार होईल. ४.५ बुभुक्षे.... क्विबन्तस्य -- आचार अर्थी असणाऱ्या क्विप् प्रत्ययाने अन्त पावणाऱ्या बुभुक्ष धातूला. आचार या अर्थी क्विप् प्रत्यय नामांना जोडून नामधातू साधले जातात. उदा. अश्वति. ४.६ णिज्झाइ -- निर् + ध्यै. झाणं गाणं -- झा, गा पासून साधलेली नामे. ४.७ जाण (धातु) पासून जाणिअ हे क.भू.धा.वि; जाणिऊण हे पू.का.धा.अ.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy