________________
५०४
टीपा
३.१७९ क्रियातिपत्ति -- संकेतार्थ.
३.१८० धातूंना न्त आणि माण हे प्रत्यय जोडूनही संकेतार्थ साधला जातो.
श्लोक १ -- हे चंद्रा ! हरणाच्या स्थानी जर तू सिंहाला (आपल्या ठिकाणी) ठेवले असतेस, तर विजयी अशा त्याच्यामुळे, तुला राहूचा त्रास सोसावा लागला नसता.
३.१८१ शतृ आनश् -- धातूपासून व.का.धा.वि. साधण्याचे हे दोन प्रत्यय
आहेत. त्यांना प्राकृतात न्त आणि माण असे आदेश होतात. शतृ प्रत्ययापूर्वी धातूच्या अन्त्य अ चा विकल्पाने ए होतो (सू.३.१५८ पहा). उदा. हसेन्त.
३.१८२ धातूला ई, न्ती, माणी जोडून स्त्रीलिंगी व.का.धा.वि. सिद्ध होतात.