SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 504
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे-तृतीय पाद ५०३ ३.१७३ विध्यादिष्वर्थेषु -- विधि इ. अर्थांमध्ये. प्राकृतमध्ये आज्ञार्थ व विध्यर्थ यात फारसा फरक मानला जात नाही असे दिसते. एकत्वे.... स्थाने -- एकवचनात असणाऱ्या तीन पुरुषांच्या (त्रयाणां) तीनही एकवचनांच्या (त्रिकाणां) स्थानी. दकारो....न्तरार्थम् -- दु मधील द् हे उच्चारण दुसऱ्या म्हणजे शौरसेनी भाषेसाठी आहे. ३.१७४ सो: स्थाने -- सु च्या स्थानी. सु साठी सू. ३.१७३ पहा. ३.१७५ लुक -- लोप; येथे प्रत्ययांचा लोप. अकारान्त धातूंच्या आज्ञार्थ द्वि.पु.ए.व. मध्ये एक रूप प्रत्ययरहित होते. उदा. हस. ३.१७७ ३.१७६ बहुष्व.... स्थाने -- बहुवचनात असणाऱ्या, तीन पुरुषांच्या, तीनही बहुवचनांच्या स्थानी. हसन्तु हसेयुः, हसत हसेत, हसाम हसेम - - हस् धातूची अनुक्रमाने तृ.पु., द्वि.पु. व प्र.पु. यांच्या बहुवचनाची क्रमाने आज्ञार्थी व विध्यर्थी रूपे. वर्तमानाया....भवत: -- वर्तमानकाळ, भविष्यकाळ, विध्यर्थ व आज्ञार्थ यांमध्ये सांगितलेल्या प्रत्ययांच्या स्थानी ज्ज आणि ज्जा हे आदेश विकल्पाने येतात; ते सर्व पुरुषांत व वचनांत वापरले जातात (सू. ३.१७८ पहा). भविष्यन्ती -- भविष्यकाळ. हसतु हसेत् - - हस् धातूचे आज्ञार्थ व विध्यर्थ तृ.पु.ए.व. अन्ये.... पीच्छन्ति - - काही वैयाकरणांच्या मते, सर्व काळ व अर्थ यांमध्ये ज्ज आणि ज्जा वापरले जातात. भवति.... अभविष्यत् -- ही रूपे भू धातूच्या तृ.पु.ए.व. ची क्रमाने वर्तमानकाळ, विध्यर्थ, आज्ञार्थ, अनद्यतनभूत, अद्यतनभूत, परोक्षभूत, आशीर्लिङ्, ता आणि स्य भविष्यकाळ व संकेतार्थ यांची संस्कृतमधील आहेत. ३.१७८ भवतु भवेत् -- सू. ३.१७७ वरील टीप पहा.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy